आपण एखाद्याला बघितल्यावर किंवा त्याच्या वागण्यावरून काही विशेष ठोकताळे, अंदाज ,कयास बांधतोकाही माणसं काही क्षणातच मनाला भावतात तर काही कितीही सहवासात राहिली तरी ओढ नावाची गोष्ट निर्माणच होत नाही.मन एक असे अजीब रसायन आहे. फक्त सौंदर्य हे प्रेमात पडायला कधीच पुरेसं नसते.खूप सुंदर असलेली व्यक्ति जर हट्टी,आत्मकेंद्रीत आणि अहंकारयुक्त असेल तर ती व्यक्तीदेखील कालांतराने कंटाळवाणी,निरस वाटू लागते, कितीही सुंदर दिसत असली तरीही कारण शेवटी आपण व्यक्तीच्या स्वभावाबरोबर रहातो.शरीर तर फक्त निमित्तमात्र आहे.त्याच व्यक्तीच्या स्वभावात गोडवा,विनयशीलता आणि शालीनता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते देवापुढे निरांजन लावलं की मन शांत होतं.घरात दिवे असूनही निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो.सहवासातील माणसांचं देखील तसेच असतं.एखाद्याच्या सौंदर्याने प्रकाशाने दिपून जाणं, हा काही क्षणांचा खेळ असतो पण खरे आत्मिक समाधान हे निरांजनाच्या इवल्याशा तेजानेच मिळतं.आयुष्यातही अनेक लोक येतात आणि निघूनही जातात.काही जण तुम्हाला दिपवून टाकतात तर काही तुमच्या आयुष्यातील अंधाराची जाणीव करून देतात.परंतु ह्या सगळ्यात खरं प्रेम निरांजनाच्या ज्योतीसारखं रहातं.शांतपणे तेवणारं आणि मनाला शांती देणारं जगात कुठलीच गोष्ट शाश्वत नाही निरंतर नसते पण सात्विक प्रेम मात्र नेहमी सोबत रहातं, जगण्याची उमेद देतनातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरुवात करता त्याचा पराभव निश्चित होतो.अंधारल्या खोलीत लावलेलं निरांजन जसं दाही दिशा उजळतं, खरे प्रेम देखील तुमची अशीच सोबत करतं.प्रेम म्हणजे भक्तिचेच एक रूप आहे. ज्याच्यात आर्तता आहे, पण याचना नाही.साधा विचार करून बघा, सभोवताली दिव्यांची आरास असतानाही आपण समईच्या तेजापुढे नतमस्तक होतो ते का ?कारण त्या तेजाला सात्विकतेचा, आपुलकीचा स्पर्श असतो.खरं सांगू? असे, निरागस, पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी मिळकत असते, अनेकांना प्रेम म्हणजे हक्क असचं वाटत असतं पण खरं प्रेमं हे हक्क नसून स्वातंत्र्य हेच असतं.
No comments:
Post a Comment