Wellcome

सपने बेचने वालो की खामोशी भी उनके बोलियों से ज्यादा महँगी होती है जनाब चंद पल की जिंदगी वक्त के बहाव मे है यहा हर शक्स अपने ही तनाव मे है हमने तो यु ही लगा दी तोहमत पाणी पर देखा नही की की छेद तो अपनी ही नाव मे है

बुधवार, 30 अगस्त 2017

का मोफत आहे Whats App / Ka mofat aahe whats app

जर आपण Whats app वापरत असाल तर  अत्यंत महत्वाचे :- धकाधकीच्या या काळात जवळपास सर्वच लोक Whats app वापरतात पण जगातील सर्वच असामान्य माणसे या सामान्य चूका  कधीच करीत नाहीत म्हणूनच ते असामान्य ठरतात . अगदीच सामान्य असणाऱ्या महत्वाच्या काही  गोष्टी कळत न कळत आपल्या कडून सुटून जातात जसे
(01) What app चालू केल्यावर प्रथम महत्वाची बाब म्हणजे आपला प्रोफाईल फोटो. हा वापरकर्त्याचा असणे   सर्वांना अपेक्षित असते  व हे सर्वांच्या हिताचेही  असते. जवळपास एक मनुष्य जास्तीत जास्त ५०० पेक्षा अधिक नंबर मोबाईल मध्ये सेव करू शकत नाही त्यामुळे आपण आपला फोटो Whats app वर DP सेव केला तर इतरांना किमान आपली ओळख अनोळखी नंबरलाही  करणे अगदी सोपे जाईल.  देव, धर्म ,मुले, फुले किव्हा इतरांचे फोटो ठेवण्यापेक्षा स्वताचा फोटो ठेवावे.
(02) Whats app प्रोफाईल वर स्वताचे नाव लिहिणे आवश्यक असते तसेच Staus मध्ये आपले नाव किव्हा आपला जर ब्लॉग असेल तर त्याचा ते नाव लिहावे कारण किमान आपली ओळख त्यावरून तरी पटविता येणे शक्य होते. बरेच लोक काहीतरी बोधात्मक लिहितात पण  त्यांच्या स्वता व्यतिरिक्त इतरांना त्याचा कधीच अर्थ उलगडत नाही किंबहुना त्यांची साधी ओळखही पटविता येत नाही.
(03) Whats app वापरताना बरेच लोकांना माहित नसते कि अनावश्यक data जो आपल्याला  नको आहे असा download करायची गरजच  नसते. फक्त setting मध्ये जाऊन data Usage मध्ये media auto download  मध्ये जेवढे  आवश्यक असतील तेवढेच फक्त पर्याय चालू ठेवावे म्हणजे सर्वच प्रकारचा  data download होणार नाही.   मोबाईल चा स्पेस ही रिकामा राहील मोबाईल व्यस्त Hang होणार नाही.
(04) facebook किव्हा यासारख्या मोठ्या क्षमतेच्या app शक्यतोवर download करू नये.  कारण त्याचे सोबत अनेक app लिंक असतात व त्या सर्व app नाईलाजाने स्वीकाराव्या लागतात. download करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
(05)अनावश्यक मजकूर जसे गुड मॉर्निंग , गुड नाइट ,हैप्पी ------असे कधीच पाठवू नये यामुळे आपली इज्जत कमी होते. तसेच कधीही देव धार्मिक धमकी,फायदा असे msg चुकून पाठवू नये त्यामुळे आपली गणना मुर्खात केली जाते.
(06) वाढदिवसाचे ,अभिनंदनाचे ,सणासुदीचे,उत्सवाचे शुभेच्छा संदेश फक्त वैयक्तिक नंबर वर पाठवले पाहिजे कारण आपण पाठविलेली माहिती सर्वाना आवडेलच असे नसते.
www.vinoddahare.blogspot.com

कोई टिप्पणी नहीं: