आज प्रत्येकाकडे कुठल्यातरी राष्ट्रीयकृत बँकेचे एक बचत खातं आहेच आहे खाजगी असो की राष्ट्रीयकृत प्रत्येक बँकेला खात्यासोबत त्याचा वारसदार म्हणजेच नॉमिनी हे बंधनकारक ठेवलेला आहे पण बऱ्याच खातेदारांच्या बचत असो की चालू खाते असो वारसदार नोंदणीकृत केलेला दिसून येत नाही. हे दिसायला जरी अगदी सोपं असलं तरी भविष्यात त्याचा खूप मोठे नुकसान ठरलेला असतो मृत्यू हा माणसाला कधी न चुकणारा व कधीतरी येणारे अटळ सत्य आहे. आपल्या पाठीमागे आपण गेल्यानंतर आपल्या त्या खात्यात शिल्लक असलेली बचत केलेली रक्कम ही आपल्या कायदेशीर वारसाला मिळावी यासाठी प्रत्येक बँकेने खाते उघडल्यानंतर एक फॉर्म भरून कायदेशीर वारसाची नोंद करण्याबाबत प्रत्येक ग्राहकाला सूचना केलेली असते आपण जेव्हा बँकेत नवीन खाते उघडतो त्यावेळेसही खाते उघडण्याच्या फॉर्ममध्ये आपल्या कायदेशीर वारसाची नोंद घेण्याबाबत आपल्याला लेखी कळवावे लागते. खाते उघडल्यावर पासबुक हातात मिळतो तेव्हा त्यावर रजिस्टर नॉमिनी असे नमूद असते तेव्हा आपल्या लक्षात येते की आपल्या खात्यावर आपल्या वारसांची नोंद झालेली नाही मग काय करायचं बँकेत जाऊन आपल्या वारसाची नोंद करण्यासाठी बँकेकडून पुरवण्यात आलेला फॉर्म घेऊन तो व्यवस्थित भरावा व त्याची झेरॉक्स काढून एक फॉर्म बँकेत जमा करावा व एक फॉर्मवर बँकेतील घेऊन तो आपल्या घरी सुरक्षित ठेवावा ज्या खात्यावर वारसाची नोंद केलेली नसते अशा खातेदाराचा मृत्यू झाल्यास खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते त्या खातेदाराचे सर्व वारस यांना 500 रुपये प्रति किमतीचे तीन ते चार मुद्रांक म्हणजेच स्टॅम्प पेपर खरेदी करून शासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते काही दिवसानंतर बँकेचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर बँक तुम्हाला कायदेशीर वारसदार म्हणून संबोधते व त्या खात्यात शिल्लक असलेली रक्कम तुम्हाला एक संयुक्त खाते काढून त्यात जमा करते अशी ही अतिशय गुंतागुंतीची व फार त्रासदायक अशी प्रक्रिया किमान दोन-तीन महिने चालते जर आपण आपल्या खात्याला वारसान नोंदणी करून ठेवली तर भविष्यात आपल्या वारसांना त्रास होणार नाही जर आपण कुठल्या बँकेत मुदती म्हणजेच फिक्स डिपॉझिट केले असेल व त्यात वारसा नोंद केली नसेल तर अशा प्रसंगी वारसान असणाऱ्या सर्व वारसांना कागदोपत्री खूप श्रम घ्यावे लागतात त्याही प्रसंगी वेगवेगळ्या किमतीचे मुद्रांक म्हणजेच स्टॅम्प पेपर व शासकीय कार्यवाही करावी लागते काही प्रसंगी तर जितके रुपयाची फिक्स डिपॉझिट असेल किमान त्याच्या पाचपट संपत्ती असणाऱ्या नागरिकाचे हमीपत्र खातेदाराचे हमीपत्र बँकेला भरून द्यावे लागते अशा या अतिशय गुंतागुंतीच्या व वेळ काढू कामांमुळे हकणाक त्रास होतो म्हणून जर आपले कुठल्याही बँकेत कोणत्याही प्रकारचे खाते असेल तर वेळात वेळ काढून कृपया आपल्या खात्यावर आपल्या वारसांची नोंद करून घ्या . मी एका उदाहरणांमध्ये असे पाहिले आहे की एका ग्राहकाचे दोन लक्ष रुपये एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये फिक्स केले होते त्याला फक्त केवळ पत्नी होती कोणतेही मूलबाळ नव्हते अचानक त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले काही कालावधीनंतर असे लक्षात आले की त्याने फिक्स केलेल्या त्या सर्टिफिकेटवर वारसांची नोंद नसल्यामुळे त्याच्या पत्नीला ही रक्कम मिळवण्याकरिता खूप हकनाक त्रास सहन करावा लागला वेगवेगळ्या किमतीचे मुद्रांक शुल्क घेऊन सर्व बँकेचे सोपस्कार पूर्ण करून दोन महिन्यानंतर हे पैसे तिच्या वैयक्तिक खात्यात वळते करण्यात आले. एका उदाहरणात असेही लक्षात आले की कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या खात्यात त्याने कोणतेही वारसान नोंदणीकृत केले नव्हते तर त्याच्या अन्य खात्यात त्याच्या एका मयत असलेल्या नातेवाईकाचे नाव नोंदवलेले असल्याचे बँकेतून कळले दोन्ही खात्यांमध्ये लाखो रुपये शिल्लक असल्याचे त्याचे मृत्युपच्यात लक्षात आले वारसांना सर्व बँकेचे सोपस्कार पूर्ण करण्यात खूप मनस्ताप सहन होत आहे बँकेतील गर्दी व कागदांची परिपुर्तता करण्याकरिता त्यांना किती दिवस लागतील हे सांगता येणे कठीण आहे अशा या वरील दोन उदाहरणांमुळे केवळ एक रुपयाचा कागद कधीतरी वेळ काढून आपण बँकेत जमा करावा व आपल्या पश्चात आपल्या वारसांना त्रास होऊ नये म्हणून वारसान नोंद करून घ्यावी.
Monday, July 21, 2025
बँक खाते वरसान नोंद आवश्यक आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment