Wellcome

हमे आज भी सस्ती चिजो का शौक नही सपने बेचने वालो की खामोशीया भी उनके लफ्जो से ज्यादा महँगी होती है |

Sunday, July 20, 2025

ग्रामीण जीवन बुटके पूल


आपल्या देशाचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून प्रत्येक खेड्याला शहराशी जोडण्याचा मनोधैर्य असलेलं प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत प्रत्येक गावाला पक्के डांबरी रस्ते बांधून दिलेत त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक खेडोपाडी असणाऱ्या रस्त्यावर गावाला जोडणाऱ्या रस्त्यांना पुलाचेही बांधकाम करण्यात येते पण हे पूल नदीच्या किंवा त्या नाल्याच्या उंची इतपतही बांधली जात नाही. अतिशय बुटक्या उंचीचे ते पूल बांधले जाते हीच खरी अडचण सामान्य नागरिकाला झालेली आहे. गावाला वेढून जाणारी नदी नाला ओढा व त्यावर बांधलेले उंचीने बुटके पूल हे खरोखर संशोधनाचा विषय आहे. गावात जाताना रस्त्यात असणारी नदीची जमिनी पासूनची खोली लक्षात न घेताकेवळ दळणवळणाच्या दृष्टीने पुलांची निर्मिती केली जाते पण ते पूल व्यावहारिकदृष्ट्या किती उंच असावे त्याचे निकष केवळ त्या बांधणाऱ्या विभागालाच माहित. सर्वसामान्य नागरिकांना सोईचे होईल असे दिसत नाही कारण बहुधा पुलाची उंची 4 ते 5 फूट इतकीच असते त्यामुळे पावसाळ्यात छोट्या पाण्यातही पूर येतो तासंतास गावाचा संपर्क तुटतो. शेतकरी विद्यार्थी मजूर सर्वांचाच कामाचा खोळंबा होतो. कधीकधी तर अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या अपघातात अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. जर जमीन लेव्हल घेऊन योग्य त्या उंचीचे पूल बांधल्यास दळणवळण सुखकर होईल. अनेकांचे प्राण वाचू शकतील. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधले जाणारे पूल हे किती दर्जेदार आहेत याचा नेम नसतो बांधले जाणारे नवीन पूल पहिल्याच पावसाळ्यात पाहून जाते किंवा अर्धवट स्थितीत अडकून राहते बांधकामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असतो किंवा ते कामच मुळात दर्जाहीन असते याला जबाबदार कोण? सर्वसाधारणपणे याला दोषी संबंधित कंत्राटदाराला ठरविले जाते पण ही सदोष यंत्रणा कधी दुरुस्त होईल ? कधी लोकांच्या निष्पाप जाणाऱ्या बळी थांबेल हे सांगता येणार नाही कधीतरी आपणही त्याच पुलावरून जाणार आहोत मरण कोणालाही चुकलेलं नाही हे मात्र त्या निष्ठुर राजकारण्यांनी कंत्राटदारांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवं आज महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये भल्या मोठ्या नद्यांवर बांधण्यात येणारी मोठी पूल पत्त्यांसारखी कोसळत आहेत याचे कुणालाच काही वाटत नाही खेडेगावात बांधली जाणारी छोटी मुलं टिचभर पावसात वाहून जातात एक तर वर्षानुवर्ष बांधली न जाणारी पुलं केवळ सरींच्या पावसात अलगद वाहून जातात व त्यांची दुरुस्ती सुद्धा वर्षानुवर्षे होत नाही ते फार भयावह आहे गावातल्या माणसांनी जगाव कसं ? आज या व्यवस्थे समोरचा खूप मोठा निष्ठुर प्रश्न आहे. शहरातल्या लोकांना फार फार चांगल्या सुविधा मिळतात येथील लोकांना सिमेंटचे रस्ते बांधून दिले जातात मग खेड्यातील लोकांना ही सगळी व्यवस्था का मिळत नाही खेड्यातील लोकांनाच या सर्व गोष्टींचे वावडे का एकाच देशात राहणाऱ्या पण वेगवेगळ्या भागातील लोकांना वेगवेगळ्या न्याय उघड डोळ्यांनी आपण पाहत आहोत. खेड्यातील माणसांच्या जीवनाचे मोल काय ? शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा यातील समतोल जर आपण लक्षात घेतला तर नक्कीच भारतीय लोकशाहीने दिलेले समानतेचे मूल्य हे कुठेतरी दुभंगलेले आहे असे चित्र आज निर्माण झालेले आहे तरी आज खेड्यातील मनुष्य आपल्या जीवन मरणाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याचाच फार मजबूर झालेला आहे तो अतिशय आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्याला किमान ज्या पावसाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या पुलाच्या समस्येने वेढले आहे त्या अत्यंत गरजेच्या अशा या प्रश्नाची सोडवणूक शासनातर्फे झाली पाहिजे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे हे तत्त्व शासनाने लक्षात घेतलं पाहिजे पावसाळ्यामुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे जेव्हा एखाद्या शेतमजुराचा अपघात होतो किंवा विषारी सर्पदंश होतो जंगली प्राण्यांचा हल्ला होतो तेव्हा त्यांना वेळीच मदत मिळू शकत नाही मात्र त्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो वैद्यकीय सुविधेसाठी त्यांना आणताना छोट्या उंचीच्या पुलावरून जर पाणी वाहत असेल आणि ते पाणी जर तासन तास उतरत नसेल तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीचा गेलेल्या जीवाला जबाबदार कोण हा प्रश्न मात्र आजही अनुत्तरीत आहे हा प्रश्न कुठेतरी सुटायला हवा या प्रश्नावर कुठेतरी आवाज उठवला गेला पाहिजे म्हणून भारतीय संसदीय लोकशाहीमध्ये कायदेमंडळ आणि सरकार यांनी या प्रश्नाची दखल घेतली पाहिजे आपण आपले लोकप्रतिधी म्हणून निवडून दिलेले आमदार खासदार किंवा इतर कोणतेही लोकप्रतिनिधी यांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर ज्या लोकांना या प्रश्नाची जाणीव आहे किंवा या प्रश्नाबाबत जे जागरूक आहेत अशा नागरिकांनी या गोष्टीची दखल घेऊन या गोष्टीचा पाठपुरावा शासनाकडे वारंवार केला पाहिजे खेड्यातील नागरिकाला सुद्धा जगण्याचा तोच समान अधिकार मिळायला हवा तो सुद्धा या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे अशा या जगाच्या पोशिंदासाठी सर्वांनी एक दिलाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे फार गरजेचे आहे हजारो विद्यार्थी या छोट्या उंचीच्या पुलामुळे अनेक दिवस आपली शाळा व शिक्षण यापासून वंचित राहतात अनेक शेतकरी जे आपल्या शेतामध्ये अन्नधान्य पिकवतात त्या पिकवलेल्या शेतमालाची या छोट्या उंचीच्या फुलांमुळे जी नासाडी होते वेळप्रसंगी तयार झालेला भाजीपाला दूध किंवा इतर त्यांच्या घरी निर्माण होणारे पदार्थ हे प्रसंगी शहरात नेऊन विक्री करता येत नाही आणि त्यांना त्यांचं नुकसान होतं अगोदरच गरिबी असलेले हे संसार पुन्हा कर्जाच्या खाईत कोसळले जातात बँकांकडून घेतलेले कर्ज त्याला करता न येणारी परतफेड आणि त्या परत फेडीसाठी होणारी ससेहोलपट यांचा ताळमेळ बसत नाही आणि वेळोवेळी शासनाच्या अनेक योजना गरीब शेतकऱ्यांसाठी किंवा गरिबांसाठी असून या कारणामुळे पूर्णत्वासही येऊ शकत नाहीत म्हणून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे हीच एक विनंती.

No comments: