Wellcome

हमे आज भी सस्ती चिजो का शौक नही सपने बेचने वालो की खामोशीया भी उनके लफ्जो से ज्यादा महँगी होती है |

Friday, July 18, 2025

शाळेबद्दल बदललेला दुष्टीकोन

मागील 4 वर्षांपासून मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेढा पंचायत समिती भिवापूर जिल्हा नागपूर येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळत आहे. शाळेची चालू शैक्षणिक वर्षातील पटसंख्यावर्ग 1 ते 7 ची 39 इतकी आहे. शालेय परिसर खूप सुंदर आहे शाळेला संपूर्ण संरक्षण भिंत आहे. भले मोठे 15 फूट रुंदीचे लोखंडी रेलिंग असलेले लोखंडी गेट आहे. शाळे सामोरील एका परिवाराचे शेती सोबत ट्रॅक्टर जिप तसेच पिकप चा व्यवसाय आहे. नेहमीच शाळेच्या समोर वाहने उभी करून ठेवतात. सांगून काही उपयोग होत नाही त्यांच्याकडे पार्किंग साठी जागाच उपलब्ध नाही तरी वाहने घेतात. शाळेला सुट्टी असली की शाळेच्या गेट समोरच वाहने उभी करतात. हा नित्यक्रम झालेला आहे ग्राम पंचायत ला लेखी कळविले पान काही उपयोग झाला नाही. शाळेतील संरक्षण भिंतीवर कपडे वाळत घालणे हा दुसरा उद्योग नियमित आहे. आज तर हद्द झाली शाळेच्या गेटवर चक्क कपडे वाळू घातले. मी सकाळी 9:00 वाजता नेहमी प्रमाणे शाळेत आलो तेव्हा शाळेच्या गेटवर कपडे वाळत घातले होते काढायला सांगितले व आपल्या नवोदयसाठी अतिरिक्त वर्ग असलेल्या वर्गात शिकवायला गेलो. 10:00 वर्ग संपला पाहतोय तर गेटवर कपडे तसेच वाळत होते. मला थोडा राग आला म्हणून शाळेच्या बाहेर आलो व ज्यांचे कपडे वाळत घातले होते त्यापैकी एका महिलेला तुम्हाला काहीच वाटत नाही का ? असे बोललो व प्रार्थणेसाठी शाळेत परत आलो. काही क्षणात त्या घरातील सर्व पुरुष व महिला शाळेत भांडण करण्यासाठी आल्या. मी त्यांचा अपमान केला असे बोलल्या. माझ्या शाळे समोर दर्शनी भागावर कुणी कपडे वाळत घालेल तर आम्ही शिक्षक आहोत म्हणून कधी पर्यंत सहन करायचे. काही वेळातच सर्व लोक निघून गेले. परमेश्वराला एवढेच मागणे आहे की आता तरी तो प्रकार बंद व्हावा.

No comments: