Wellcome

सपने बेचने वालो की खामोशी भी उनके बोलियों से ज्यादा महँगी होती है जनाब चंद पल की जिंदगी वक्त के बहाव मे है यहा हर शक्स अपने ही तनाव मे है हमने तो यु ही लगा दी तोहमत पाणी पर देखा नही की की छेद तो अपनी ही नाव मे है

शुक्रवार, 25 अगस्त 2017

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची व्यथा / Government Employees Salary Distress


वेतनाची व्यथा 
शासनाने सर्व कर्मचार्यांना नियमित पगार 1 तारखेला द्यावा असे कितीतरी आदेश काढले पण प्रत्यक्षात तसे होताना दिसून येत नाही 1 तारखेचा पगार किमान ५ तारखेला तरी खात्यात जमा व्हावा अशी साधी माफक अपेक्षा एक सर्वसाधारण कर्मचारी ठेवतो पण काही लोकांच्या नशिबी दुखः हे सदैव पाचवीला पुजलेले असते वेळेवर पगार न होणे ही सर्वस्वी मानवी चूक आहे असे मी मानतो  कारण पैसा हा मानवाने आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केला आहे.  मनुष्याच्या गरजा जेव्हा अमर्याद वाढतात आणी कर्तव्याकडे कानाडोळा होतो तेव्हा अधिकारांच्या गुर्मीत मनुष्य बेधुंध व बेशिस्त होतो. आपल्यामुळे  इतरांना काही त्रास होत असेल याची त्यांना जरा ही खंत नसते कारण जसे जीभेच्या चवीसाठी बोकडाचा जीव जातो पण जीभेला त्याचे काही मोल नसते तसे  त्या कर्मचार्याला किती वेदना होत असतील याचा अंदाज घेताच  येत नाही. स्वताची जबाबदारी पुर्णपणे न स्वीकारणे ,गोड गोड बोलून थातुरमातुर कामे करणे म्हणजे इतरांना प्रेमाने आपल्या पाठीवर बसवून खाईत ढकलून देणे किव्हा प्रेमाने गोडगोड खाऊ घालून साखरेच्या आजाराने जीव घेणे हा प्रकार होय. वादळ येण्यापूर्वी जशी सागरात एकदम निरव शांतता असते पण अचानक वादळ येतो व मोठमोठे अस्तित्व असनारे जहाज यांना क्षणात निस्तनाभूत करून जातो .शेवटी वारा हळुवार आला कि तो गारवा म्हणून मनाला हवा हवासा असतो पण तोच वारा जेव्हा प्रचंड व रौद्र रूप धारण करतो तेव्हा फक्त विनाश आणि विनाशाचेच रूप असतो पावसाचे पाणी तुरळक सरीचे रूप घेते तेव्हा मुले माणसे आबाल वृद्ध आनंदाने त्याचे स्वागत करतात. पण तोच पाऊस जेव्हा एका पुराचे रूप घेतो तेव्हा त्याची दिशा असते  फक्त विनाश आणि विनाश.  कर्मचारी एक शांततामय ,सहनशील ,वैचारिक पातळी असणारा ,समाज शील घटक, इतरांचे भविष्य घडविणारा कुंभार पण त्याच्या नशिबी काय काय भोग लिहिले आहेत ते सर्वश्रुत दिसते आहे. काही लोक नौकरीच्या पूर्वार्धात चुकीचे निर्णय घेऊन आपले आर्थिक आयुष्यच खच्ची करून जवळपास नाहीसे करतात पैशाची चण चण ,कर्जाचे हफ्ते,घर चालविण्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत आणि यामुळे उडणारी तारांबळ यात सर्वस्वी त्याचे कंबरडे मोडून जाते.  जगण्याला दिशाच उरत नाहीत  पण यातूनही अनेक लोक याही परीस्थितीत स्वताला सावरतात आर्थिक नियोजनाचे स्थर्य नसतानाही  कधी मित्र म्हनतात म्हणून किव्हा नातेवाईक टोमणे मारतात म्हनून स्वताला दोष देऊनही  लाजिरवाणे जीवन जगतानाही  पुन्हा नव्या उमेदीने नव्या वाट शोधतात , काहीतरी प्रपंचासाठी, कुटुंबासाठी केले पाहिजे म्हणून स्वतःला विसरून कुठे तरी चांगल्या वैचारिक लोकांचे सहवासात मार्गदर्शनात आपल्या म्हातारे आईवडील, लहान लहान लेकरांसाठी, बहिण भावांसाठी ,सतत दुखी असणाऱ्या पत्नीसाठी स्वतःच्या छाताडावर कर्जाचा अधिकच मोठा डोंगर पुन्हा उभा करतात व जमेल तिथून व मिळेल तसे कर्ज घेतात एक छोटेसे का होईना पण हक्काचे घर उभे करतात आधीच अठरा विश्वे दारिद्र्यात असलेला हा कर्मचारी पुन्हा आर्थिक संकटाच्या गर्तेत बुडत जातो जुने पतपेढीचे असणारे कर्ज पगार कपात येईल तेव्हा तर भरतोच  पण नवीन कर्ज मात्र खाजगी बँकेतून किव्हा रास्ट्रीयकृत बँकेतून घेतो जी त्याचे कर्जाचे हप्ते ECS किव्हा चेकने मिळवून घेते. नियमाने व नेमाने कर्ज देणारी संस्था आपले कर्ज वसुलीची तारीख मात्र  निश्चीत करते.  ठराविक तारखेला आपली रक्कम परस्पर खात्यातून कापून घेते पण महिन्याला जमा होणारा पगार नेमाने खात्यात जमा झाला नाही तर कर्जाचे हप्ते चुकतात आणि अतिरिक्त दंडापाई  किमान ५०० ते १००० रु जास्तीचे दरमहा दंड म्हणून भरून द्यावे लागतात . कर्ज वेळेवर चुकते न झाल्यामुळे जो विद्त्त्दात्याकडून वारंवार मनस्ताप होतो त्याची भरपाई तर होऊच शकत नाही. काही लोक आनंदासाठी कर्जावर किमान एखादे चारचाकी वाहन घेतात पण वेळेवर पगार जमा न झाल्याने कर्जाचे हफ्ते वेळेवर भरले जात नाही व नामुष्कीचा  भाव झेलावा लागतो . एका उदासीन यंत्रणेमुळे घरातील एकमेव कमावत्या कर्मचार्याच्या म्हातारे आईवडीलांची औषधे, उपचार वेळेवर होऊ शकत नाही व कधीकधी तर जीवन यात्रा ही संपून जाते. शासकिय नौकरी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी सर्वाना जरी वाटत असली तरी अश्या परीस्थितीत मात्र एका वेठ्बिगारापेक्षा वेगळी अशी अवस्था उरत नाही . काय गुन्हा असतो ? त्या अबोध बालकांचा ज्यांच्या खाऊचे हक्काचे पैसे त्या कर्मचार्याला उदासीन यंत्रणेमुळे बँकेचे हफ्ते दंड रुपात भरावे लागतात ?  काय गुन्हा असतो ? त्या म्हातारया आई वडिलांचा ज्यांच्या औषधाचे हक्काचे पैसे उदासीन यंत्रणेमुळे बँकेचे हफ्ते दंड रुपात भरावे लागतात ? काय गुन्हा असतो त्या रात्रांदिवस आपल्या कुटुंबासाठी झटणाऱ्या माउलीचा ?  जी दररोज आपल्या लाचार आणि बंदिस्त जीवन जगणाऱ्या पतीचे दुख उघळ्या डोळ्यांनी पाहते  पण स्वता साठी कधी ५०० रु  खर्च करू शकत नाही.  ओल्या नयनांनी  एका उदासीन यंत्रणेमुळे हक्काचे पैसे , बँकेचे हफ्ते दंड रुपात भरताना पाहून मनोमन रडते. भविष्याचा वेध घेऊन जे नियोजन करीत नाही किव्हा नोकरीशी इमान राखणाऱ्या अश्या कर्मचार्यांना तर वेळोवेळी सावकाराकडे  त्यांच्या निकडीच्या गरजा भागविण्यासाठी वेळप्रसंगी उरलेसुरले दागिने गहन ठेवावे लागतात.  कधीकधी तर अवैध सावकाराकडून  मोठ्या व्याजाने तात्पुरते कर्ज काढावे लागते . शेवटी एक दिवस मनाचा हिय्या होतो व ज्वालामुखी फुटतो . अबोला असणाऱ्या लोकांचा बांध फुटतो व सर्वच संपून जाते . भूतलावरची मानसे म्हनतात ग्रहण लागले होते सूर्याला सूर्यास्त झाला व ग्रहण सुटले पण जेव्हा लोक जसे वैचारिक पातळी घाथून वर वर जातात तसे त्यांना हे कळून चुकते कि सूर्याला कधीच ग्रहण लागत नाही किव्हा त्याचा अस्तही होत नाही हा तर फक्त पाहणार्याचा दृष्टीचा भ्रम  असतो म्हणून म्हणावेसे वाटते कुभाराच्या हातातल्या  मातीचे  कुम्भारानेच ठरवावे कि आपण त्याचे काय बनवावे ? चिलीम कि सुरई ? कारण चिलीम बनविली तर जीवनभर स्वताही जळेल आणि इताराना जाळेल  आणि सूरई बनविली तर स्वता बरोबर इतरांना शीतलतेचा आनंद देईल . काही कर्मचारी , अधिकारी अल्पावधीत लोकांच्या मनात कायमस्वरूपी  चांगले घर करतात . ते जगात आपल्या वर्तणुकीने इतरांचे कष्ट , दुख कसे कमी करता येईल ? याचा प्रयत्न करीत असतात . या पृथ्वी तलावर क्षणाक्षणाला  लाखो जीव जन्माला येतात पण एक रात्र किडा, पतंगा  स्वताचे आयुष संपवूनही  इतरांसाठी जग प्रकाशित, प्रकाशमान  करतो.  मी आपल्या सहवासातील अधिकार्यांना नम्र विनंती करतो की जर आपण आपल्या कामात प्रामाणिक असाल तर नक्कीच त्या प्रमानिकतेचा  इतरांना फायदा होऊ द्या आपल्या वाणीतून प्रबोधन होऊ द्या .तुमच्या  सारखे असंख्य हात या देशाला आज गरजेचे आहेत . तळागाळातील मानसे ज्यांनी तळहातावरचे पोट मोठ्या हिमतीने जगण्यासाठी उभे केले आहे त्यांना जगण्याचे बळ द्या आपला एक विश्वास त्यांचे अवघे आयुष्य बदलून टाकेल हे  नक्की.  आज पर्यंत हा भटका उपेक्षित समाज घटक मोठ्या मेहनतीने , जिद्दीने ,गुणवत्तेच्या आधारावर उभा होतो आहे त्याला सावरण्याची जबाबदारी आपली सामुहिक नव्हे का ? किमान आपण तरी आपल्या सोशिक भटक्या समाजासाठी ही भावना सदोदित ठेऊया. समाज धुरिणांचे लोंढे हे सत्तेचे वाटेकरी होताना आजवर पहिले आहे पण सत्तेचा मोह नसणारेच लोकच  या समाजाचे काहीतरी भले करतील अशी निरभ्र आशा करतो  www.vinoddahare.blogspot.com

कोई टिप्पणी नहीं: