बाबासाहेब एकदा म्हणाले होते कि या जगात अन्याय करणारा जेवढा दोषी नाही त्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो कारण तो मानसिकरित्या गुलाम झालेला मांडलिकत्व पत्करलेला व अस्तित्व गमावून बसलेला लाचार , आपल्याच लोकांनी दुरावलेला सोशिक असतो आणि त्याची प्रचीती पदोपदी आज 27/2 च्या शासन निर्णय च्या अंमलबजावणी प्रसंगी होताना दिसून येते आहे स्वताच्या जीवाचा आटापिटा करणारा प्रत्येक शिक्षक मग तो संवर्ग 1 असो, 2 असो, ३ असो, ४ असो की दस्तुरखुद्द निगरगट्ट प्रशासन मग रात्ररात्र जागून बदलीची माहिती संकलित करणारे शिक्षक व प्रशासन याच्या कामाची केविलवाणी दयनीय त्राही त्राही अवस्था पाहताना त्या इतिहासाची आजही आठवण करून देते कि जर शिवरायाचे विचार सर्वांच्या हृदयी हयात असते तर ही वेळ आमच्या सारख्या सम्भाजी वर आज आली नसती लाचारी पत्करलेले शिक्षक संघटनाचे तथाकातीत नेते, स्वार्थासाठी फक्त देखावा निर्माण करनारे पुढारी ,आजच्या घडिचे जयचंद हे महारास्त्रातील तमाम शिक्षक संवर्ग ४ च्या अधपतनाचे मानकरी ठरणार असणार आहेत पण इतिहास साक्षीला आहे की फांदीवर बसूनी झाडाच्या जे मुळावरी उठले त्यांचे अवघे संसार हकनाक पेटले एवढेच करूनी तुम्हास काय भेटले शेवटी काय तर जयचंदा तू मोगलांचेच पाय चाटले अरे उद्या गती तुझी होणार त्या खिताबी फितूर खा बहादूर खा सारखी वेड्या जयचंदा तुला मोगल तर काफिरच ठरवील आणि उभ्या आयुष्यात लढा देणारे एकल गुरुजी तोंडात तुझ्या शेणाचा घास भरवील अरे ते राज्यकर्ते का झालेत तर आम्ही संघटनेच्या वतनदार्या घेवून बसलोय म्हणून अरे काय मजाल होती त्या १५० वर्षाच्या गुलामिची काय बोध घेता त्या महान शायरापासून तो शायर म्हणतो यु तो पेड के कटने का किस्सा न होता अगर कुल्हाडी के पिछे लकडी का हिस्सा न होता चार महिन्या पासून एकल शिक्षक संघटना एकट्याने नौकरी करणाऱ्या संवर्ग ४ च्या शिक्षकांना एकत्र येऊन लढा देण्याचे आव्हान करीत आहे किमान राज्यातील ६ जिल्हे एकत्र आलेत पण जे एकत्र आलेत त्यांची टिंगल टवाळी पदोपदी करण्या पलीकडे सर्वच जयचन्दासहित धन्यताच मानतात कारण स्वताची सरंजामशाही नाकारू पाहणाऱ्या , आभासी मखमली शालेत लोळण घालणाऱ्या त्या शिक्षकांना कुम्भकर्णी झोपेतून उठवण्यासाठी अंगावर हत्तीच काय डायनासोरही फिरवून , तुडवूनही उठविणे इतके सोपे नाही कारण गेंड्याचे कातडी कवचाचा वरवर दिसणारा मुलामा, जयचन्दांना मोगलानकडून मिळालेली भ्रामक आश्वासने, मोगल सम्राटांची नीती यांना बळी पडलेले पंगु ,लाचार, बद्फैली असे हे यांचा आज काय नी उद्या काय आत्मसन्मान असणार आहे त्यांच्या बरोबर आमचा जो पर्यंत संपूर्ण नायनाट होत नाही तोपर्यंत ते झोपेचे सोन्गातून उठणे कदापी शक्य वाटत नाही पण यापुढे असे होणे नाही कारण अलेक्झांडर आपल्या आत्मचरित्रात लिहितो हे माझ्या लढवय्या सैनिका तू माझ्यासाठी जीवाचे रान करतोस जर मी जीवाच्या आकांताने भीतीने चुकीचे आदेश देत असेल तर आधी माझे शीर कलम करन्यास सोबत्यांना एकत्र कर नंतरच शत्रू सिमोलंघन कर काय शिक्षकांच्या जीवनाच्या मदारी खेळ मांडला इथे या चौसराच्या पाटावर कुणी प्यादे तुम्ही आम्ही सर्वच ना अरे आता तरी समजून घ्या तुमच्या अटटाहासापाई अख्खी पिढी गारद होण्याच्या मार्गावर आहे ज्या शिक्षकांचे भरोश्यावर एवढा मोठा प्रपंच मांडला आहे त्याची किमान तरी तमा बाळगा अरे हाणू ती रीत आणि पाडू ती प्रथा ही कुठली संस्कृती रुजवू पाहता इथे नुसत्या लालसेने हुरळून जाऊन स्वता बरोबर इतरांचे अस्तीत्व संपवू पाहणाऱ्यानो तुमची कीव येते जर आमचा बळी गेला तर लढले भूवरी प्राण तयाचे शहीद गणला रंणागणी गाफील राहिला काफिर ठरला भाग्य कुठले पदोपदी शासनाचे … Read more

No comments:
Post a Comment