एकदा काही शिकारी जंगलात वेगवेगळ्या भागात शिकार करीत होते. सर्वांचे लक्ष शिकार मिळविणे हेच होते. वेगवेगळ्या लढण्यामुळे बंदुकीच्या नुसत्या आवाजाने कुणाकुणाला शिकार मिळत नव्हती. त्यामुळे काही शिकारी हताश झाले होते. तर काही निष्णावात अनुभवी असल्याने त्यांना सावजही चांगले सापडत होते. त्यांच्या शिकारीमुळे जंगलातील प्राणी कमी होऊ लागल्याने मांसभक्षी प्राण्यांना भविष्याची संकटे दिसू लागले ते वाघाला शरण गेले. त्यांनी एकजूट केली व शिकार्यांना हुसकावून लावण्यासाठी विविध हिस्र प्राण्यांना पाठविले गेले अनेक शिकारी गर्भगळीत झाले अस्तित्वच नाहीसे होण्याच्या भितीने सर्व शिकार्यांनी एक गट तयार केला व आपआपल्या सर्व बंदुका एका रांगेत एकत्र उभ्या केल्या. जंगली प्राण्यांना ते पाहून भिती वाटली. हत्तीने हल्ला करताच सर्व बंदूकीतून गोळ्या झाडल्या गेल्या. हत्ती सैरवैर झाले व जंगलात परतले. शिकारी खूप आनंदी झालेत कारण ते विजयी झाले होते. अनेक दिवस असेच चालले. पण फक्त प्राण वाचविण्यासाठी बंदुका चालविणे असा शिकार्यांचा उपक्रम झाला होता. शिकार होत नव्हती. भुकेने व्याकुळ झालेल्या काही शिकार्यांनी परत जाण्याचा सल्ला दिला.पण काही निष्णात शिकार्यांना तो मान्य झाला नाही. म्हणून काही शिकारी आपल्या बंदूका घेऊन माघारी परत निघाले. उरलेल्या शिकार्यांपैकी काहींच्या बंदूका तोफेसारख्या चालत होत्या तर काही बंदूका जागेवर गंजून गेल्या. परावलंबीत्वामुळे काही शिकारी स्वताच्या बंदूका चालविण्यासाठी तयार नव्हते. तर काही शिकार्यांना चालविण्यासाठी बंदूका नादुरुस्त झाल्या होत्या. भुकेने व्याकुळ शिकारी जगुही शकत नव्हते आणी जंगली प्राण्यांच्या भितीने जंगलातून जाऊ ही शकत नव्हते.दोन्ही बाजूने फसल्याने शिकार्यांची स्वताच शिकार झाली.
No comments:
Post a Comment