Wellcome

सपने बेचने वालो की खामोशी भी उनके बोलियों से ज्यादा महँगी होती है जनाब चंद पल की जिंदगी वक्त के बहाव मे है यहा हर शक्स अपने ही तनाव मे है हमने तो यु ही लगा दी तोहमत पाणी पर देखा नही की की छेद तो अपनी ही नाव मे है

मंगलवार, 14 नवंबर 2023

व्यापारातील अलिखित नियम


अनेक व्यापारी वर्गात आप आपल्या व्यापाराचे काही ठराविक नियम असतात. तसेच काही व्यापारी समूहाचे सुद्धा काही ठराविक अलिखित नियम असतात. त्यापैकी एक लिखित नियम इलेकट्रोनिक मार्केट मध्ये सहज गतीने दिसत नसला तरी अनुभवायला मिळाला. काही राजस्थानी मंडळी एकत्र येऊन मार्केट मध्ये इलेक्ट्रॉनिक सामानाची दुकाने थाटून बसलेली आहेत वर्षाला अनेक नवीन दुकाने ते लोक मिळेल त्या ठिकाणी शहरात थाटत असतात . एकाच प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विविध कंपनीच्या डिलरशिप वेगवेगळे दुकानदार घेतात जर उदाहरण पाहायचे झाल्यास आपण ups चे घेतले तर एकाकडे intex दुसऱ्याकडे iball तिसऱ्याकडे microtek अशी विविध कंपनीची डिलरशिप हे लोक घेतात जर तुम्ही intex डीलर च्या दुकानात गेलात तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला इंटेक्स ups दिसतील तो तुम्हाला योग्य किमतीत ते खरेदी करण्याचं सल्ला देईल तो ups कसा चांगला आहे हे पटवून देईल जर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या कंपनीच ups विचारले तर उपलब्ध असेल तर दाखवेल नाही तर गोदामातून आणून देतो म्हणून ५ मिनिटात तुमच्या समोर हजर करेल. किमतीत ५०  ते १०० रुपये एवढच फरक असेल. समजा तुम्ही दुसऱ्या दुकानात गेलात तर तो त्याच्याजवळ ज्या कंपनीचे ups असेल तो ते दाखवेल व जर तुम्ही त्याला दुसऱ्या तिसऱ्या कंपनीच ups विचारले तर उपलब्ध असेल तर दाखवेल नाही तर गोदामातून आणून देतो म्हणून ५ मिनिटात आणून तुमच्या समोर हजर करेल. पहिल्या दुकानदाराने सांगितलेला intex ups  किमतीत ५०  ते १०० रुपये वाढलेले असेल एवढाच फरक असेल. का होते असे तर एकदम साधे लॉजिक आहे त्या सर्व दुकानदाराना माहित आहे की हा ग्राहक चार दुकानात चौकशी करून आलेला आहे व तो ज्या कंपनीचे नाव प्रथम घेत आहे त्याने त्या ups बद्दल चौकशी केलेली आहे. एकतर ग्राहक त्या पहिल्या दुकानात जाऊन स्वस्त किमतीला तो ups खरेदी करेल किव्हा त्याच्याकडे उपलब्ध असलेला ups खरेदी करेल. जर त्याच्याकडे उपलब्ध  नसलेला ups तुम्ही मागितला तर गोदामातून आणून देतो म्हणून ५ मिनिटात आणून तुमच्या समोर हजर करेल. सोबत एक कागद दुकान मालकाच्या हातात दुकानातील नौकर देईल त्याच्याशी तुम्हाला काहीही घेणेदेणे नसते. तुम्ही ठरलेली रक्कम देऊन बिल घेऊन निघून जाता. इथे तुमचा व्यवहार संपतो आणि त्यांचा व्यापार चालू होतो. आठवडाभर सामानाची देवाण घेवाण सर्व  दुकानातून होत असते कुणीही प्रत्येक व्यवहाराला नगदी पैसे देत नाही. पण शनिवारी किव्हा रविवारी सर्व व्यापारी आप आपला सर्व हिशोब करतात कुणी कोणता माल कोणत्या व्यापाऱ्याला किती दिला होता. किती रुपये घेणे देणे आहे त्याचा सर्व हिशॊब नगदी किव्हा चेकने पूर्ण केला जातो. का केले जाते असे ? व्यापारात खूप स्पर्धा आहे अनेक कंपन्या आहेत मग ते व्यापारी साप्ताहिक बैठकीत आपआपसात ठरवितात की कुठल्या कंपनीचा कुठल्या मालाची कुणी डिलरशिप घ्यायची जेणेकरून व्यापारात स्पर्धा होणार नाही बाजारपेठ काबीज करायची असेल तर एकोपा आवश्यक आहे हे तत्व त्यांनी स्वतःहून अंगिकारले आहे. सर्वांजवळ सर्व वस्तूंचा स्टाक असण्यापेक्षा एका कंपनीचा स्टाक एकाजवळ असल्यास सर्वाना सुविधा होईलच असे धोरण ते सर्व मिळून आखतात व यशस्वीपणे अगदी शांतपणे देखावा न करता व्यापार करतात.

कोई टिप्पणी नहीं: