आज प्रत्येकाकडे कुठल्यातरी राष्ट्रीयकृत बँकेचे एक बचत खातं आहेच आहे खाजगी असो की राष्ट्रीयकृत प्रत्येक बँकेला खात्यासोबत त्याचा वारसदार म्हणजेच नॉमिनी हे बंधनकारक ठेवलेला आहे पण बऱ्याच खातेदारांच्या बचत असो की चालू खाते असो वारसदार नोंदणीकृत केलेला दिसून येत नाही. हे दिसायला जरी अगदी सोपं असलं तरी भविष्यात त्याचा खूप मोठे नुकसान ठरलेला असतो मृत्यू हा माणसाला कधी न चुकणारा व कधीतरी येणारे अटळ सत्य आहे. आपल्या पाठीमागे आपण गेल्यानंतर आपल्या त्या खात्यात शिल्लक असलेली बचत केलेली रक्कम ही आपल्या कायदेशीर वारसाला मिळावी यासाठी प्रत्येक बँकेने खाते उघडल्यानंतर एक फॉर्म भरून कायदेशीर वारसाची नोंद करण्याबाबत प्रत्येक ग्राहकाला सूचना केलेली असते आपण जेव्हा बँकेत नवीन खाते उघडतो त्यावेळेसही खाते उघडण्याच्या फॉर्ममध्ये आपल्या कायदेशीर वारसाची नोंद घेण्याबाबत आपल्याला लेखी कळवावे लागते. खाते उघडल्यावर पासबुक हातात मिळतो तेव्हा त्यावर रजिस्टर नॉमिनी असे नमूद असते तेव्हा आपल्या लक्षात येते की आपल्या खात्यावर आपल्या वारसांची नोंद झालेली नाही मग काय करायचं बँकेत जाऊन आपल्या वारसाची नोंद करण्यासाठी बँकेकडून पुरवण्यात आलेला फॉर्म घेऊन तो व्यवस्थित भरावा व त्याची झेरॉक्स काढून एक फॉर्म बँकेत जमा करावा व एक फॉर्मवर बँकेतील घेऊन तो आपल्या घरी सुरक्षित ठेवावा ज्या खात्यावर वारसाची नोंद केलेली नसते अशा खातेदाराचा मृत्यू झाल्यास खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते त्या खातेदाराचे सर्व वारस यांना 500 रुपये प्रति किमतीचे तीन ते चार मुद्रांक म्हणजेच स्टॅम्प पेपर खरेदी करून शासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते काही दिवसानंतर बँकेचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर बँक तुम्हाला कायदेशीर वारसदार म्हणून संबोधते व त्या खात्यात शिल्लक असलेली रक्कम तुम्हाला एक संयुक्त खाते काढून त्यात जमा करते अशी ही अतिशय गुंतागुंतीची व फार त्रासदायक अशी प्रक्रिया किमान दोन-तीन महिने चालते जर आपण आपल्या खात्याला वारसान नोंदणी करून ठेवली तर भविष्यात आपल्या वारसांना त्रास होणार नाही जर आपण कुठल्या बँकेत मुदती म्हणजेच फिक्स डिपॉझिट केले असेल व त्यात वारसा नोंद केली नसेल तर अशा प्रसंगी वारसान असणाऱ्या सर्व वारसांना कागदोपत्री खूप श्रम घ्यावे लागतात त्याही प्रसंगी वेगवेगळ्या किमतीचे मुद्रांक म्हणजेच स्टॅम्प पेपर व शासकीय कार्यवाही करावी लागते काही प्रसंगी तर जितके रुपयाची फिक्स डिपॉझिट असेल किमान त्याच्या पाचपट संपत्ती असणाऱ्या नागरिकाचे हमीपत्र खातेदाराचे हमीपत्र बँकेला भरून द्यावे लागते अशा या अतिशय गुंतागुंतीच्या व वेळ काढू कामांमुळे हकणाक त्रास होतो म्हणून जर आपले कुठल्याही बँकेत कोणत्याही प्रकारचे खाते असेल तर वेळात वेळ काढून कृपया आपल्या खात्यावर आपल्या वारसांची नोंद करून घ्या . मी एका उदाहरणांमध्ये असे पाहिले आहे की एका ग्राहकाचे दोन लक्ष रुपये एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये फिक्स केले होते त्याला फक्त केवळ पत्नी होती कोणतेही मूलबाळ नव्हते अचानक त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले काही कालावधीनंतर असे लक्षात आले की त्याने फिक्स केलेल्या त्या सर्टिफिकेटवर वारसांची नोंद नसल्यामुळे त्याच्या पत्नीला ही रक्कम मिळवण्याकरिता खूप हकनाक त्रास सहन करावा लागला वेगवेगळ्या किमतीचे मुद्रांक शुल्क घेऊन सर्व बँकेचे सोपस्कार पूर्ण करून दोन महिन्यानंतर हे पैसे तिच्या वैयक्तिक खात्यात वळते करण्यात आले. एका उदाहरणात असेही लक्षात आले की कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या खात्यात त्याने कोणतेही वारसान नोंदणीकृत केले नव्हते तर त्याच्या अन्य खात्यात त्याच्या एका मयत असलेल्या नातेवाईकाचे नाव नोंदवलेले असल्याचे बँकेतून कळले दोन्ही खात्यांमध्ये लाखो रुपये शिल्लक असल्याचे त्याचे मृत्युपच्यात लक्षात आले वारसांना सर्व बँकेचे सोपस्कार पूर्ण करण्यात खूप मनस्ताप सहन होत आहे बँकेतील गर्दी व कागदांची परिपुर्तता करण्याकरिता त्यांना किती दिवस लागतील हे सांगता येणे कठीण आहे अशा या वरील दोन उदाहरणांमुळे केवळ एक रुपयाचा कागद कधीतरी वेळ काढून आपण बँकेत जमा करावा व आपल्या पश्चात आपल्या वारसांना त्रास होऊ नये म्हणून वारसान नोंद करून घ्यावी.
Rich Thoughts & Habbits
Monday, July 21, 2025
बँक खाते वरसान नोंद आवश्यक आहे
Sunday, July 20, 2025
ग्रामीण जीवन बुटके पूल
Friday, July 18, 2025
शाळेबद्दल बदललेला दुष्टीकोन
मागील 4 वर्षांपासून मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेढा पंचायत समिती भिवापूर जिल्हा नागपूर येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळत आहे. शाळेची चालू शैक्षणिक वर्षातील पटसंख्यावर्ग 1 ते 7 ची 39 इतकी आहे. शालेय परिसर खूप सुंदर आहे शाळेला संपूर्ण संरक्षण भिंत आहे. भले मोठे 15 फूट रुंदीचे लोखंडी रेलिंग असलेले लोखंडी गेट आहे. शाळे सामोरील एका परिवाराचे शेती सोबत ट्रॅक्टर जिप तसेच पिकप चा व्यवसाय आहे. नेहमीच शाळेच्या समोर वाहने उभी करून ठेवतात. सांगून काही उपयोग होत नाही त्यांच्याकडे पार्किंग साठी जागाच उपलब्ध नाही तरी वाहने घेतात. शाळेला सुट्टी असली की शाळेच्या गेट समोरच वाहने उभी करतात. हा नित्यक्रम झालेला आहे ग्राम पंचायत ला लेखी कळविले पान काही उपयोग झाला नाही. शाळेतील संरक्षण भिंतीवर कपडे वाळत घालणे हा दुसरा उद्योग नियमित आहे. आज तर हद्द झाली शाळेच्या गेटवर चक्क कपडे वाळू घातले. मी सकाळी 9:00 वाजता नेहमी प्रमाणे शाळेत आलो तेव्हा शाळेच्या गेटवर कपडे वाळत घातले होते काढायला सांगितले व आपल्या नवोदयसाठी अतिरिक्त वर्ग असलेल्या वर्गात शिकवायला गेलो. 10:00 वर्ग संपला पाहतोय तर गेटवर कपडे तसेच वाळत होते. मला थोडा राग आला म्हणून शाळेच्या बाहेर आलो व ज्यांचे कपडे वाळत घातले होते त्यापैकी एका महिलेला तुम्हाला काहीच वाटत नाही का ? असे बोललो व प्रार्थणेसाठी शाळेत परत आलो. काही क्षणात त्या घरातील सर्व पुरुष व महिला शाळेत भांडण करण्यासाठी आल्या. मी त्यांचा अपमान केला असे बोलल्या. माझ्या शाळे समोर दर्शनी भागावर कुणी कपडे वाळत घालेल तर आम्ही शिक्षक आहोत म्हणून कधी पर्यंत सहन करायचे. काही वेळातच सर्व लोक निघून गेले. परमेश्वराला एवढेच मागणे आहे की आता तरी तो प्रकार बंद व्हावा.
Wednesday, August 7, 2024
शिक्षक बदली व प्रशासन
श्रेयवादाने राजकारण नासले असे म्हणत असताना आता शिक्षण क्षेत्र ही त्याला अपवाद नाही असे खेदाने म्हटले जाते अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा हा शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचा प्रश्न शेवटी आज अखेर उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने थांबला अनेक शिक्षक संघटनांनी 2025 मध्ये होणाऱ्या बदलांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालय येथे अनेक याचिका दाखल केल्या त्यातील अत्यंत महत्त्वाची याचिका होती ती म्हणजे बदल्या करण्याची अयोग्य वेळ शासनाचे निर्देश असताना मे महिन्याचे शेवटी पर्यंत शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात असे असताना जुलै महिना अर्ध्यावर आला तरी शाळा चालू झाल्या तरी शिक्षकांचे शिकवणी सुरू झाले तरी शिक्षकांच्या बदलांचा मेळ बसेना एक तर शिक्षकांच्या बदल्यांची संवर्ग व त्यात महाराष्ट्रातील हजारो शिक्षक यांच्या एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हजारो बदल्या एकाच वेळी एकाच तारखेला करायच्या हा खूप मोठा गुंतागुंतीचा प्रश्न शासनाने नेमलेल्या विंचीस या कंपनीच्या सॉफ्टवेअरला चालवताना संवर्गनिहाय त्यात संवर्ग एक नंतर संवर्ग दोन तीन चार असे संवर्ग झाल्यानंतरही उर्वरित रिक्त राहिलेल्या जागेवर विस्थापित राऊंड करून बदल्या करण्याची किमया करणे म्हणजे खूप मोठी कसरत करणे होय प्राथमिक शिक्षकांची खूप मोठी संख्या त्यातही वेगवेगळ्या लोकांना दिलेले संवर्गनिहाय आरक्षण इत्यादी गोष्टी यांचा योग्य ताळमेळ बसवताना दररोज नवीन नवनवीन येणारे बदल सूचना यामुळे शासनाने जरी शिक्षकांच्या बदल्या मे अखेरीस कराव्यात असे सुचवले असले तरी अनेक वर्षापासून ते शासनाला शक्य झालेले दिसत नाही सन 2018 मध्ये यशस्वीरित्या पहिल्यांदाच पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात ऑनलाइन प्रमाणातील बदल्या झाल्या होत्या त्यानंतर मात्र अशी किमया होऊ शकली नाही 2025 मध्ये मात्र ऑनलाईन बदल्या होतील शासनाने बदल्यांचे वेळापत्रकही जाहीर केले होते मात्र योग्य नियोजना अभावी किंवा वारंवार येणाऱ्या सूचनामुळे ते शक्य होऊ शकले नाही शेवटी काही संघटना आणि वैयक्तिक शिक्षक संघटनांचे नेते माननीय न्यायालयात गेले आपापल्या मागण्या त्यांनी न्यायालय पुढे मांडल्या मुख्य मागणी ही होती की बदला करण्याची अवधी आणि काळ संपुष्टात आलेला आहे शासनाने निर्धारित केलेल्या कालावधी संपून खूप काळ लोटलेला आहे आणि माननीय न्यायालयाने त्या याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करून शेवटी जैसे ती परिस्थिती ठेवली व बदलीची प्रक्रिया पुढे करता येणार नाही त्याचप्रमाणे बदली करणाऱ्या सॉफ्टवेअरच्या कंपनीस यापुढे कोणतेही काम करू नये असे ढोबळ मानाने सांगता येईल असा निकाल दिला ज्या शिक्षकांनी आपल्या शाळेवर लक्ष केंद्रित केले आहे आपल्या मुलांचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे त्या शिक्षकांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे नुकत्याच काही दिवसापूर्वी संवर्ग एक च्या बदल्या झालेल्या होत्या त्याच्या याद्याही प्रकाशित झाल्या होत्या आणि त्यांना मिळालेली गावही कळली होती पण मात्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांचा हिरमोड झाला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बदला ह्या रद्द होतात हेही एक खूप मोठे संशोधनाचा विषय असू शकते महाराष्ट्रातील इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द होण्याची फार कमी आठवण येते पण शिक्षकांच्या बदल्या मात्र ह्या ना त्या कारणाने रद्द होण्याची ही काही पहिली वेळ नाही न्यायालयाचा मान करूया व पुढील एक वर्ष पुन्हा बदलीसाठी वाट बघू या