Wellcome

हमे आज भी सस्ती चिजो का शौक नही सपने बेचने वालो की खामोशीया भी उनके लफ्जो से ज्यादा महँगी होती है |

Thursday, July 11, 2024

Solar System

 


घरावर सोलर सिस्टीम लावावी की नाही.


1) सोलर प्लेट नाजूक असल्यामुळे माकडांच्या हौदोसात त्या तुटतात. किंवा माकडांना मारण्यात येणाऱ्या  छोटे अनुकुचित दगड यामुळे एक सोलर प्लेट तूटू शकतात. किमान 10000/- रु पर्यंत खर्च करून प्लेट बसवावी लागते. 1 किलो वॕटसाठी 3 प्लेट आवश्यक असतात इलेक्ट्रिक सर्कल पूर्ण होण्यासाठी आवश्यक प्लेट लावल्या तर पूर्ण क्षमतेने सिस्टीम कार्य करते. त्यामुळे एकदा सोलर सिस्टीम लावली की प्लेटची तुटण्याची भिती मनात सदैव घर करून राहते. आकस्मिक खर्च सदैव मनात लपून बसलेला असतो.


2) एक किलो वॕट सोलर लावण्यापूर्वी 5 युनिट विज तयार करतो असे सांगण्यात येते पण प्रत्यक्षात पूर्ण क्षमतेने 4 युनिट पर्यंत विज तयार करू शकते क्वचितच 5 युनिट विज तयार होतांना दिसून येते. महीन्याभरात जनरेट झालेली संपूर्ण विजेचा फायदा ग्राहकाला होत नाही जवळपास 25 ते 35% विज युनिट आॕफसेट म्हणून मोजले जात नाही. सोलरमध्ये Genration झालेले विजेचे युनिट त्यापैकी export केलेले युनिट व Import केलेले युनिट याचा ताळमेळ सर्वसाधारणपणे समजत नाही.


3) सोलर सिस्टीम कोणत्याही महीन्यांमध्ये लावा एप्रिल महीन्यात Unit Bank मध्ये जमा असलेल्या युनिटचे पैसे अतिशय कमी दराने MSEB तुमच्या विजेच्या खात्यावर जमा करते. मे महीन्यात जमा झालेले युनिट व वापर याच्यात विज बिल अपेक्षेने थोडे येते पण विजखात्यात रक्कम असल्याने ते बिल समायोजित केले जाते. खरा हिशोब जून महीन्यापासून सूरू होतो विज Bank मध्ये युनिट शिल्लक राहत नाही कारण पावसाळ्यात सोलर विज फार कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे विजबिल मोठ्या प्रमाणात येते विजेचा वापर मोठ्या प्रमाणात केलेल्या सवयीमुळे पुढील 4 महीने बिल भरण्याची तयारी असावी लागते. तदनंतर ढगाळ वातावरणामुळे हिवाळ्यात विज कमीच तयार होते व विजेचे बिल भरावे लागू शकते.


4) आर्थिक बाबतीत विचार केला तर ३ किलो वॕट साठी जवळपास 200000/- रू खर्ची पडतात तर  दोन ते महीन्यांमध्ये 42000/- पर्यंत सबसिडी परत मिळते 200000/- रू कर्ज म्हणून बँकेतून सोलर सिस्टीम फायनांस केल्यास 10% दराने एक वर्षात बँकेला 20000/- व्याज म्हणजे जवळपास 1700/- महीना रक्कम व्याजापोटी द्यावी लागते. सर्वसाधारणपणे 3 किलोवॕट विज वापरणारे ग्राहक ज्यांचा दैनिक विजेचा वापर 5 युनिट पर्यंत असेल त्याला साधारणपणे विजबिल 600/- ते 800/- रू येत असेल. जर हेच 200000/- रू इतरत्र गुंतवणूक केल्यास 7 ते 10% परताव्यासह दरमहा विजबिल भरण्यासाठी पुरेशी रक्कम गुंतवणूकीतून दरमहा मिळू शकेल.


5) 25 वर्षापर्यंत सोलर प्लेट कार्यक्षमतेने काम करतील हे काळ ठरवेल पण सोलर इनवर्टर वारंटी कालावधी एक वर्षाचा सोडला तर किती काळ कार्यक्षम राहील हे त्यावर अवलंबून राहील. वारंटी जरी असली तरी दुरूस्ती खर्च ग्राहकालाच करावा लागेल.


वरील बाबींचा व्यवहार्य अभ्यास केला असता सोलर सिस्टीम लावणे  व्यवहार ठरू शकत नाही.

विनोद डहारे 

(Financial Adviser ) www.vinoddahare.blogspot.com

No comments: