शिक्षक बदली कविता
गुरुजीच ठरला गुरुजीचा शत्रू हकनाक २७/२ ला रेटले
अविश्वासाच्या लढाईत सामान्य शिक्षकाला काय भेटले?
एक GR आला अन नेत्यांचे रान पेटले
काहींनी तर सरळ सरळ न्यायालयाच गाठले.
पाहता पाहता वाटाघाटीत एक शुद्धिपत्रक आले
न्यायालयाच्या निर्णयाने होत्याचे नव्हते झाले.
तात्काळ शासनाने शिक्षक विरोधी GR काढला
काय कमी तर DCPS गुरुजीचा ताण वाढला.
सुविधा न देता ही सरकार सर्व काही मागते
एका TUC साठी गुरुजी अख्खी रात्र
जागते.
खेड्यातला गुरुजी सुखी आहे त्यांचे सारे काही भागते
मंत्रालयाच्या वार्या करून पुढारी कोणासाठी मागते.
मला वाटते यापुढे असेच विरोधी GR येणार
घरात बसून सारे Whats app वर मत
देणार.
हक्कासाठी लढताना मोर्च्यात शिक्षकांचा नाही पूर
असेच चालत राहिले तर इतिहासाला दिवस नाही दूर
सामान्य शिक्षकाच्या बहिष्काराचा हा सर्व योग आहे
पुढारी विरुद्ध सामान्य हा तर जुनाच रोग आहे.
मन दुखले असेल तर आपली माफी मागतो
मी ही माझ्या TUC साठी आता रात्रभर जागतो.
www.vinoddahare.blogspot.com
1 टिप्पणी:
nice poem
एक टिप्पणी भेजें