Wellcome

हमे आज भी सस्ती चिजो का शौक नही सपने बेचने वालो की खामोशीया भी उनके लफ्जो से ज्यादा महँगी होती है |

Monday, June 19, 2017

जगातील सामान्य ते सामान्य मानसे / Ordinary to ordinary minds in the world

जॅक मा

एक शिक्षक ते चीनचा सर्वात श्रीमंत माणूस - अचंबित करणारा प्रवास
सक्सेस स्टोरीज आपल्या सर्वाना आवडतात. हलाखीच्या परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या व्यक्तींच्या एकदम “लार्जर दॅन लाइफ” गोष्टी आपल्याला नेहमीच मोहात पाडतात. खरं तर अनेक उपदेशांपेक्षा या खऱ्याखुऱ्या सत्यकथाच आपल्याला जास्त प्रेरित करतात. मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशाच व्यक्तीबद्दल आणि त्याच्या स्वप्नवत वाटणाऱ्या यशोगाथेबद्दल सांगणार आहे. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा माणसाबद्दल ज्याने चीनसारख्या मोठ्या देशाची अर्थव्यवस्था आणि इंटरनेट उद्योगाची बाजारपेठ एकहाती बदलवून टाकली. त्याचे पूर्ण आयुष्य हे एखाद्या चित्रपटकथेला लाजवेल इतके थक्क करणारे आहे.
ही कथा आहे जॅक मा (Jack Ma) याची जॅक मा हा अलिबाबा.कॉम (Alibaba.com) या जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीचा आणि अलीपे (Alipay) या ई-पेमेंट कंपनीचा संस्थापक आहे. सध्या तो अधिकृतरीत्या चीनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस आहे. जॅक मा ची संपत्ती तब्बल २५०० करोड अमेरिकी डॉलर्स इतकी महाप्रचंड आहे. जॅक मा च्या अलिबाबा या कंपनीने २०१४ मध्ये  अमेरिकेच्या शेअरमार्केट मध्ये प्रवेश केला आणि त्यात अमेरिकेच्या (आणि जगाच्या) इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक (तब्बल १५००० करोड अमेरिकी डॉलर्स) नोंदवण्यात आली. अलीबाबा या कंपनीचे केवळ 7.8% शेअर्स हाती असताना जॅक मा एवढा श्रीमंत आहे, याहून अधिक शेअर्स असते तर जॅक मा ची संपत्ती किती वाढली असती याचा विचार न केलेलाच बरा..हे सर्व आकडे पाहून तुमच्या डोळ्यासमोर एखादया गर्विष्ठ आणि गर्भश्रीमंत माणसाचा चेहरा आला असेल ना... परंतु हीच खरी कथा आहे... जॅक मा हा एका गरीब घराण्यातून आलेला साधासुधा मनुष्य आहे. अलिबाबा.कॉम सुरु करण्याआधी जॅक एक इंग्लिश शिक्षक म्हणून काम करत होता. पण शिक्षक म्हणून स्थिरावण्याच्या आधीही जॅकने बऱ्याच खचता खाल्या आहेत. इतक्या की ‘जॅक = अपयश’ हे एक समीकरणच बनून गेले होते.जॅक चे खरे नाव आहे "मा युन". चीनमधील Hangzhou या प्रांतात मोठा भाऊ आणि धाकट्या बहिणीसोबत जॅक लहानाचा मोठा झाला. त्याचा जन्म १९६४ सालचा. आई-वडील जागोजागी संगीतातून कथाकथनाचे खेळ करायचे. घराची परिस्थिती मध्यमवर्गाहून थोडी कमी म्हणता येईल अशी. लहानपणापासून जॅकने नापास होण्याचा सपाटाच लावलेला. प्राथमिक शाळेत तो दोनदा नापास झाला. माध्यमिक शाळेत तीन वेळा नापास झाला. महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठीच्या पूर्वपरीक्षेत तीन वेळा नापास झाला तेव्हा कुठे त्याचा कॉलेजप्रवास सुरु झाला. हे झालं शिक्षणाचं पुढे नोकरीच्या बाबतीत तर जॅकने आणखीनच अपयश पाहिलं. तीन वर्षे प्रवेशासाठी वाट पाहिल्यानंतर तीन वर्षानी जॅकने पदवी प्राप्त केली खरी पण पहिली नोकरी मिळवण्याआधी जॅकला ३० वेळा नकार ऐकावा लागला. त्यापैकीच एक नकार होता जगप्रसिद्ध KFC चा. जेव्हा KFC चीन मध्ये नुकताच आली होती तेव्हा जॅक राहायचा त्या भागातील २४ जणांनी तेथे जॉबसाठी प्रयत्न केला होता. त्यापैकी जॅक वगळता इतर २३ जणांना नोकरी मिळाली होती. जॅकने पोलिसात भरती होण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तिथेही त्याच्या पदरी निराशाच आली. कॉलेजचे शिक्षण इंग्लिशमधून झाले असल्याने जॅकचे इंग्रजी थोडेफार बरे होते म्हणून त्याने काही दिवस "टुरीस्ट गाईड" म्हणून देखील काम केले. तेथेच त्याला एका परदेशी पर्यटक मुलीने जॅक हे नाव दिले. पुढे होता होता जॅक एक इंग्लिश शिक्षक म्हणून स्थिरावला. आणि त्यानंतर जॅकच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणणारी एक गोष्ट झाली. १९९५ मध्ये चीन सरकारच्या एका उपक्रमाअंतर्गत जॅकला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याचे वय होते अवघे ३१ वर्षे.अमेरिकेमध्ये जॅकचा कम्प्युटर्स आणि इंटरनेटशी पहिल्यांदा संबंध आला. तेव्हा चीन मध्ये कम्प्युटर्स अतिशय दुर्मिळ होते. इंटरनेट आणि इमेल्स तर जवळजवळ अस्तित्वातच नव्हत्या. नेटवर त्याने चायना असं सर्च केल्यावर त्याला काहीच माहिती मिळाली नाही. आपल्या देशातही हे असावं असं जॅकला वाटू लागलं. त्याने तसं वेडच घेतलं. हे स्वप्न घेऊन जॅक मायदेशी परतला. सर्वप्रथम काही मित्रांकडून पैसे घेऊन त्याने व्यवसायाला सुरुवात केली. प्रोग्रामिंगचे अजिबात ज्ञान नसताना, व्यवसायाचा आणि विक्रीचा काहीही अनुभव पाठीशी नसतांना आणि मुख्य म्हणजे इंटरनेट वापरणारा पुरेसा ग्राहकवर्ग नसतानाही जॅकने अलिबाबा ही ई-कॉमर्स कंपनी सुरु केली. ऑनलाईन खरेदी करणे हे सोयीचे आणि सुरक्षित आहे हे ग्राहकाना पटवून देण्यात अलिबाबाने बराच वेळ खर्ची घातला. पण हळूहळू जॅकला यश येऊ लागले. पुढे जसजसा इंटरनेटचा प्रसार वाढत गेला तसा अलिबाबाचा पसारा देखील वाढत गेला आणि बघता बघता अलिबाबा.कॉम ही चीनमधील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी बनली.अलिबाबाचा पसारा केवळ चीन पुरताच मर्यादित न ठेवता जॅकने जगात इतर देशातही पाय रोवायला सुरुवात केली. इतकी की आता जगभरात सर्वाधिक विक्री असणाऱ्या कंपन्यांमध्ये अलिबाबा दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिला नंबर आहे वॉलमार्टचा. जॅक मा नावाच्या एका साध्या माणसाने केवळ २० वर्षात एक अजस्त्र कंपनी उभी केली. हे शक्य झाले ते केवळ मोठ ध्येय उराशी बाळगण्याने आणि अपयशाने खचून न जाण्याच्या जॅकच्या वृत्तीमुळे.ध्येय ठरवणे, आपल्या ध्येयावर विश्वास असणे आणि ते पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत करणे ही यशस्वी उद्योगाची/उद्योजकाची मुख्य त्रिसूत्री आहे. जॅकने देखील याचा पुरेपूर प्रत्यय दिला आहे. नुकताच जॅक मा याने भारताच्या स्नॅपडील (Snapdeal) आणि पेटीएम (PayTM) या कंपन्यामध्ये गुंतवणूक करून भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे.
डॉ. अब्दुल कलाम 

यांना पायलट बनायचे होते.. त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस्.सी. ला एडमीशन घेतली..
नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की ,पायलट बनायचे असेल तर ईंजीनीयरींग मधील 'एयरोनॉटीकल ईंजीनीयरींग' ला प्रवेश घ्यावा लागतो !..मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले !..खुप रडले!..परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले !...नंतर एयरोनाॅटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली ,त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले !.. त्यात डॉ कलाम टॉपर होते !..त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची !.त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या!.अर्ज आठ !.. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर !..ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!.डॉ. कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मीळाली! डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे,या निर्णयामुळे सीलेक्शन कमीटीने त्यांना नाकारले !.डॉ. कलाम खुप हताश झाले !रामकृष्ण मठातच बालपण गेल्यामुळे उदास होऊन हरीद्वारच्या मठात गेले !तेथील स्वामीजींनी सांगीतले, " का ऊदास होतोस?.. जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ नव्हे, की तु कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनु शकत नाही !.. कदाचीत ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल !.डॉ. कलाम घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले!.दुस-या दिवशी पेपरमधे,"एयरोनाॅटीकल इंजीनियर पाहीजे" अशी जाहीरात होती, कुण्या विक्रम साराभाईंची !.. पगार एअर इंडीयाच्या दुप्पट !ईंटरव्यूहला पुन्हा तेच आठ कँडीडेट!.एकच जागा !यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली !दुस-या दिवशी नोकरीला गेले, म्हणाले, "सांगा विमान कुठे घेऊन जायचे?"विक्रम साराभाई म्हणाले, "आपल्या जवळ विमानच नाहीये ..आणि मला खात्री आहे की हे विमान तूच बनवू शकशील!"पुढचा इतिहास तुम्हाला माहीती आहे !तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ध्ये़य मिळवू शकले नसाल, तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरु नका !...
जीवनात अयशस्वी जरी झालोत तरी निराश होऊ नये कारण,F.A.I.L. चा अर्थ First Attempt In Learning
असाच आहे..प्रयत्नांना कधीही शेवट नसतो कारण,E.N.D. चा अर्थ Efforts Never Die असाच घेऊयात..!!
आयुष्यात कोणाकडूनही नकार आला तरीखचून जाऊ नये कारण,N.O. म्हणजे Next Opportunityम्हणून नेहमी आशावादी राहावे आणि जीवनात पुढेच चालत राहावे
श्रीकांत जिचकार 

➡एकच माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस अधिकारी तसंच आयएएस अधिकारी होता.
 याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार,खासदार आणि मंत्रीही होता.
इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे""- श्रीकांत जिचकार" यांचा  2004 साली अपघाती मृत्यु झाला
याप्रकऱणी आज कोर्टाने एसटी महामंडळाला जबाबदार धरलं आहे. तसंच जिचकार यांच्या कुटुंबियांना 50 लाख 67 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.शैक्षणिक क्षेत्रातील ‘ महामेरू ’ म्हणून संबोधता येईल, असं नाव म्हणजे श्रीकांत जिचकार होय. अवघ्या 49 वर्षांचं जीवन,42 विद्यापीठं, 20 पदव्या आणि 28 सुवर्णपदकंअसा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला.आयएएस असो वा आयपीएस, एलएलएमअसो वा एमबीबीएस, देशातील बहुतेक सर्वचपदव्यां मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे.जिचकारांनी मिळवलेल्या 20 पदव्यांमध्येएमबीबीएस आणि एमडी,एलएलबी, एलएलएम, डीबीएमआणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे.जिचकरांनी 10 विषयांत एम.ए. केलं. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र,अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉपी,राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्व,मानसशास्त्र यांचा समावेश आहे.जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिटही पदवी मिळवली.जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून मिळवल्या आहेत.
श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तींच्या पक्तिंत गणती होते.या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने,ज्ञानदेवता सरस्वतीलाही अक्षरश: मोहून टाकलं. त्यामुळेच आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष वाया जाऊ न देता, बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरलं.जिचकार यांनी 1978साली यूपीएससीची परिक्षा दिली. यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून आयपीएस झाले. पुढे दोनच वर्षात म्हणजे 1980 साली त्यांनी आयएएसची पदवी देखिल घेऊन टाकली.जिचकार यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह आहे.विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आयएएसचा राजीनामा दिला. या बुद्धिवंताने वयाच्या 25 व्या वर्षी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. जिचकार महाराष्ट्र विधानसभेमध्ये १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण आमदार होते.जिचकारांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले.एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता.
यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली.१९९२ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली.जिचकार १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले.त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठी ही काम केले.जिचकार यांचा जन्म नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका छोट्याश्या गावात झाला. जगातील सर्वात हुशार 10 (Brilliant) स्टूडेंट मधे पहिल्या 1 क्रमांकामधे बुद्धिमान म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे.त्यांनी जगभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरे आयोजित करुन मार्गदर्शन केले. डॉ.जिचकार यांनी जगातले पहिले कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपुर येथे सुरु करुण जगभर आपल्या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार केला.त्यांच्या मरणोपरांत त्यांचा परिवार नागपुरला वास्तव्यास आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा डॉ. श्रीकांत जिचकार कर्मयोगि अवलीयास सलाम...

No comments: