Wellcome

हमे आज भी सस्ती चिजो का शौक नही सपने बेचने वालो की खामोशीया भी उनके लफ्जो से ज्यादा महँगी होती है |

Thursday, September 28, 2017

शासनाची शिक्षणाची तळमळ / The government's craving for education



राज्यात शिक्षण व्यवस्थेत online सरल प्रणालीमुळे केलेले अमुलाग्र बदल हे आज जरी काही विशिष्ट घटकांना नकोसे व त्रासदायक वाटत असले तरी ते उद्याच्या पीढीच्या उज्वल भविष्यासाठी कधी ना कधी ते करावेच लागणार होते. समाजाची उत्क्रांती ही सतत होतच असते. परिवर्तन हा संसारचा नियम आहे. कालपरत्वे काही बदल हे करावेच लागतात व ते अपरिहार्य असतात.  शासनाने विद्यार्थ्यांची  सर्व प्रकारची माहिती  online सरल प्रणालीत भरण्यास सर्व शाळांना सांगितली आहे. वेळोवेळी नवनवीन माहिती अद्यावत करण्याच्या सूचना शासनाकडून येत असतात.  उद्याच्या उज्वल भविष्यासाठी त्या विद्यार्थाची संपूर्ण माहिती संगीणीकृत असली तर भविष्यात हव्या त्या वेळी हव्या त्या ठिकाणी सर्वांना सत्य ती मिळवता येईल. माहिती संगीणीकृत करण्याच्या भूमिकेत एक बाब प्रकर्षाने जाणवते ती अशी की राज्यातील सर्व शाळेत सर्व विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची माहिती भरण्याच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्यात. काहींनी याचे तंतोतंत पालन केले.  जवळपास शासनाकडे अधिकृत असलेल्या सर्व शाळानी त्या भरल्यात पण मोठ्या प्रमाणात ज्या शाळा अनधिकृत आहेत ते यापासून सुटले . हजारो रुपये फी च्या नावावर उकळणारी मंडळी चिरीमिरीच्या माध्यमातून आपले उखळ पांढरे करून घेते. पण त्या विद्यार्थ्यांची शासकीय प्रणालीत नोंद मात्र होत नाही. याला जेवढे ते जबाबदार आहेत त्यापेक्षा अधिकारी व पालक जास्त जबाबदार आहेत. यापूर्वी शाळेय शिक्षण घेणारे  प्राथमिक ,माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या  विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची online माहिती शासनाजवळ उपलब्ध  नव्हती. शासनाची भूमिका online बाबतीत कुणाला काहीही वाटू दे पण मला जी जाणवते ती काही अशी आहे. शासन सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व संबंधित सर्व माहिती सरल प्रणालीत भरण्यास सांगते त्यामागची शासनाची भूमिका एका सुजन नागरिकाच्या मते ही असू शकेल 
०१. आधार कार्ड हा देशातील एक महत्वाचा कागदी पुरावा मानला जातो त्याचे आधारे राज्यातील सर्व शाळेत सर्व विद्यार्थांची माहिती शासनाकडे असावी जेणेकरून शिक्षण विभाग आपल्या विद्यार्थ्यांसाठी वर्षानुवर्षे ज्या योजना अंदाजाने तयार करीत होते त्या योजना त्यांना आता प्रत्यक्षरित्या राबविता येतील. आज पर्यंत त्रयस्त संस्थेमार्फत विद्यार्थ्यांची गणना ,मुल्यामापन केले असता कधीही विद्यार्थ्यांची संख्या समान येऊ शकली नाही. विद्यार्थ्यांना पुरविण्यात  येणाऱ्या सुविधा व आर्थिक मदत सरळ त्याचे नावे त्यापर्यंत पोहोचविण्यासाठी यामुळे मदत होईल.
०२. विद्यार्थी व शिक्षक हे प्रमाण एकमेकावर अवलंबून  असते.  शिक्षकांचे अस्तित्व हे विद्यार्थ्यांवर अवलंबून असते. शिक्षण संस्था कोणतीही असो.  पण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षकांची उपलब्धता करावीच लागते. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आधारित शिक्षक संख्या हे समीकरण यात ज्या शाळेत विद्यार्थी कमी आहेत त्या शाळेत शिक्षकांची नेमणूक करण्यास शासनाला फार मोलाची मदत होणार आहे. आज पर्यंत जी काही शिक्षक भरती झाली त्यात उर्वरित करावी लागणारी शिक्षक भरती किव्हा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ही प्रक्रिया फार जलद व स्वच्छ गतीने या माध्यमातून करता येईल.
०३. आधार कार्ड व माहिती च्या मदतीने शाळेत दाखल केलेली विद्यार्थी संख्या यांचे सत्यता ही यंत्रणेला लगेच पडताळणी करता येईल. जुन्या शिक्षण व्यवस्थेत नावापुरते विद्यार्थी दाखल करायचे व शिक्षक भरती आणि अन्यत्र अनुदान लाटण्यासाठी केलेला खटाटोप पुर्नपणे बंद होईल. अस्तित्वात नसलेल्या शेकडो शाळा आपोआप बंद होतील.
०४. अधिकार्यांवरील अतिरिक्त कार्याचे दडपण कमी होईल.सरल प्रणालीमुळे प्रत्येक अधिकाऱ्या जवळ त्याच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व विद्याथी व शिक्षक तथा कर्मचार्यांची योग्य व स्पस्ट माहिती असेल त्यांना सुद्धा आपले विविध कामांचे नियोजन करण्यास सोपे जाईल. 
०५. भविष्यात आधार कार्ड च्या माध्यमातून शाळेत शिक्षक , विद्यार्थी व अधिकारी यांना बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यासाठी या तंत्राचा वापर होणार आहे. शाळेत वेळेवर येणारी विद्यार्थी ,शिक्षक ,अधिकारी यांना यामुळे स्वताच्या कर्तव्याची जाणीव होणार आहे कारण यंत्राला भावना नसतात.
०६.बायोमेट्रिक प्रणालीच्या हजेरी मुळे शाळेत येणारी प्रत्यक्ष बालके यांची खरी माहिती शासनास तत्काळ कळणार आहे त्यामुळे शिक्षकांचे श्रम कमी होतील  बायोमेट्रिक प्रणालीच्या हजेरी मुळे शालेय पोषण आहार प्रणालीत शिक्षकांना दररोज विद्यार्थी व इतर नोंदणी करावी लागणार नाही. सर्वर लिंक असल्यामुळे शिक्षकांचे वेतन प्रणालीत ही वेतनाचा विलंब दूर होईल तसेच अधिकार्यांना शाळेला भेट देताना एक सत्य समाधान मिळेल.
०७.चुकीच्या माध्यमातून लाटले जाणारे शेकडो रुपयाचे अनुदान थांबणार आहे. कारण एक विद्यार्थी आधार कार्ड क्रमांक दोन शाळेत राहू शकत नाही. खोटे विद्यार्थी दाखविणाऱ्या शाळांवर अपोआप चाप बसेल.
०८. online कामाच्या माध्यमातून हजारो शिक्षकांच्या बदल्या समाधानकारक झालेल्या आहेत. कोणत्याही राजकीय वशिल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वीरीत्या प्रथमच केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. भविष्यात यापेक्षाही सुंदर असे काम करण्यास शासनास प्रेरणा मिळेत यात शंका नाही.  
०९. भविष्यात online च्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी हवे असणारे तंत्स्नेही गुणात्मक शिक्षकांची गरज तंत्रज्ञानाचे आधारे तत्काळ पुरविली जाईल. तसेच शिक्षक समायोजनासाठी लागणारा काळ अत्यल्प असेल व शक्य तितक्या लवकर विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षक मिळू शकतील तसेच अतिरिक्त शिक्षकांना त्यांचे हक्काचे शाळेत समाधान मिळेल.
१०. या online प्रणालीमुळे शैक्षणिक राजकीय प्रभाव कमी होईल. राजकीय प्रभाव वापरून अशैक्षणिक कामे करणाऱ्या शिक्षकांना यामुळे नक्कीच त्यांची  चूक दिसेल. जाणूनबुजून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ठेवणाऱ्या त्या शिक्षकांना वर्तमान काळात जरी दिखाऊ समाधान वाटत असले तरी त्याचा भविष्यकाळ फार दुखद असणार आहे हे नक्की.  
www.vinoddahare.blogspot.com
  

No comments: