Wellcome

हमे आज भी सस्ती चिजो का शौक नही सपने बेचने वालो की खामोशीया भी उनके लफ्जो से ज्यादा महँगी होती है |

Sunday, March 24, 2019

भगवान बुद्धांनी सांगितलेले प्रकृतीचे तीन नियम / The three laws of nature stated by Lord Buddha

  भगवान बुध्दांनी सांगितलेले प्रकृतीचे तीन कडक नियम जे सत्य आहे...‼

1. प्रकृतिचा  पहिला नियम:

सुपीक शेतात बी पेरले नाही तर निसर्ग अशी शेती तृण व  घास-गवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी मनात लहानपणा पासून  व बुद्धीत सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपोआप तयार होतात. हीच मनावरील कवचे होत..
 2. प्रकृतिचा दूसरा नियम:
ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो.
सुखी सुख वाटतो,
दुःखी दुःख वाटतो,
ज्ञानी ज्ञान वाटतो,
भ्रमित करणारा भ्रम वाटतो.
घाबरणारा भय वाटतो,

 3. प्रकृतिचा तिसरा नियम:

आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका, त्यातच समाधानी रहा.. कारण
भोजन जर पचले नाही तर रोग वाढतात,
पैसा पचला नाही तर देखावा वाढतो,
बातचित पचली नाही तर  चुगली वाढते,
प्रशंसा पचली नाही तर अंहकार वाढतो,
टिका पचली नाही तर दुश्मनी वाढते,
गोपनीयता टिकली नाहीतर भीती वाढतो,
दुःख पचले नाही तर  निराशा वाढते,
आणि सुख पचले नाही तर  पाप वाढते.

No comments: