मित्रानो आपल्या जीवनात आपल्या अन्नाचा मनावर काय परिणाम होतो ? हे आज अपण याद्वारे जानून घेणार आहोत. अन्न आपल्या मनावर खुप मोठा सकारात्मक तसेच नकारात्मक प्रभाव टाकतो. यावर आपण एक उदाहरण बघु व नक्की करुया की अन्नाचा आपल्या मनावर के परिनाम होतो.
★"तीन महीन्याचा एक प्रयोग करुन बघा सात्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा सकरात्मक बदल दिसून येतो कारण जसे अन्न तसे मन .सात्विक अन्न हे फक्त शाकाहारी भोजन नाही तर ते ईश्वराच्या स्मरणात बनवलेले भोजन असते. ज्यात आपण आपली पूर्ण श्रद्धा लावलेली असते.
★जर आपण रागात स्वयंपाक केला असेल तर त्यास सात्विक अन्न म्हणत नाहीत. म्हणून स्वयंपाक करणाऱ्याने कधीही, रागात, उदास, नाराज होऊन स्वयंपाक करू नये. (अन्न शिजवू नये)
★तसेच कधीही स्वयंपाक करताना आईला, बहिणीला, पत्नीला (जे कोणी स्वयंपाक करत असतील त्यांना) ओरडू, रागवू नये, त्यांच्याशी भांडू नये. कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाक घरात मध्ये जाऊन स्वयंपाक करताना त्या पदार्थात त्याच प्रकारची (सर्व रागाची) स्पंदने येतात आणि तेच आपण खाणार असतो. हे लक्षात ठेवण्याची महत्त्व पूर्ण गोष्ट आहे.
भोजन तीन प्रकारचे असते
१) जे आपण वेळप्रसंगी हाॅटेल मध्ये खातो. त्याला जेवन म्हणतो .
२) जे घरात आई, पत्नी बनवते, किव्हा घरातील सदस्य प्रेमाने बनवितात त्याला अमृत म्हणतो.
३) जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो त्याला महाप्रसाद म्हणतो.
असे तिन्ही भोजनात वेगवेगळी स्पंदने असतात.
(१) जे हाॅटलात पदार्थ बनवतात ते विकत घेऊन खावे लागते, आपण नेहमी खाल्ल्यास ती स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाही, त्यामुळे कधी कधी त्या अन्नाने आपणास त्रास होतो, ते पदार्थ शिजवण्यात पुरूषाचा हात असतो, त्याचा भाव फक्त पैसे कमवण्याचा असतो, तोच भाव आपल्यात उतरतो.
(२) घरात आई, पत्नी किव्हा जे कुणी जे पदार्थ अन्न तयार करते ती फार प्रेमाने तयार करित असते. म्हणून त्या पदार्थात सात्त्विक स्पंदने असतात, ती आपणास समाधानी बनवतात. हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात, त्याच्या मनातील विचार आपणास सुख व समाधान देत नाहीत. घरात जर मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल की मला अजून एक चपाती पाहिजे तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलुन येतो, ती अजून प्रेमाने एक चपाती त्यास वाढेल, ती त्यात प्रेम भरते. पण हेच आपण स्वयंपाकी कडे मागितले तर तो किव्हा ती विचार करेल की हा अजुन किती चपाती खातो, तो खाण्याचा हिशोब करून चपाती करून देईल पण त्यात प्रेम नसते, असे खाणे कधी आरोग्यवर्धक नसते ज्याला अन्न अंगी लागत नाही असे म्हणतात.
(३) मंदिरात जे अन्न आपण अन्नकोटात खातो तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो ती भावना प्रसादाची असते. ते अन्न ईश्वराला स्मरण करुन शिजवलेले असते म्हणून ते अन्न प्रसाद होते. आपण ही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत असे समजून अन्न बनवावे म्हणजे तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाक घर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करावा म्हणजे रोज प्रसाद भक्षण होईल. स्वयंपाक करताना अनेक उपाय ही करता येतात, घरात काही त्रास असेल तर त्यावर हा एक उपाय आहे ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा.परमेश्वरास म्हणावे की माझ्या मुलांचे चांगले होऊदे, तो चांगला वागु दे त्याच्या मनात शांती निर्माण होऊ दे, हे अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा. हे परमेश्वरा माझ्या पतीला नौकरित ,कामधंद्यात फार टेंशन आहे त्याचा त्रास जाऊ दे व त्यांना सर्व कार्यात यश मिळू दे असे स्वयंपाक करताना म्हणत जा त्यामुळे बराच फरक पडत जातो.कारण जसे अन्न तसे मन होते. अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्कारांचा ही परिणाम होतो (करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्या विलक्षण परिणाम होतो.) अन्न हे पूर्ण ब्रम्ह म्हटले आहे. ते यासाठीच अन्नाचा कधीही लोभ करू नये किव्हा त्याग करू नये. अन्नाचा त्याग केल्यास अन्नासाठी वनवन भटकावे लागते. पण अन्न मुखी लागत नाही. कुणी अन्नाच्या ताटावर जेवायला वाढले असेल तर गरीब किव्हा श्रीमंतीचा भेद करू नका | अन्नाला नकार देणारी लोक बहुधा जीवनात उपाशी झोपतात.भिक मागनारी भिक्षेकरी ही आपल्या प्रारब्धाची देनी चुकवित असतात. तुम्ही अनेकदा असा अनुभव घेतला असेल की कधी कधी रागात काही लोक जेवानासाठी मुद्दाम नकार देतात पण त्याना त्या

No comments:
Post a Comment