शिक्षक भरतीच्या नावावर नुसते तोंडाला पाने पुसण्याचा एक कलमी कार्यक्रम राज्य सरकार कडून केला जात आहे.अनेक वर्षांपासून विविध कारणांनी रिक्त झालेली शिक्षकांची पदे कोणतेही सरकार १००% क्षमतेने भरू शकले नाहीत.हजारो शिक्षकांच्या बदल्या २०२३ मध्ये करून अनेक शाळात आज असमतोल झाला आहे. विविध कारणांनी रिक्त झालेली पदे तात्काळ भरणे आवश्यक आहे. शिक्षक या पदासाठी दुसरा पर्याय नाही. सरकारची न पटणारी व आश्चर्य थकीत करणारी बातमी एकूण आपण कुठल्या जगात आहोत हे कळायला मार्ग नाही. सरकार ५८ व्या वर्षी शिक्षकाला सेवानिवृत्त करते यामागे शरीरिक व मानसिक कारण दिले जाते. मग आता हे ७० वर्षापर्यंत वय असलेले सेवानिवृृत शिक्षक पुन्हा सेवा देणार म्हणजे एका बाजूला शासन निवृत्ती कायदा व आत्ता घेण्यात येणारे सेवानिवृृत शिक्षक ही खूप मोठी विसंगती आहे असे माझे मत आहे. एकीकडे जिल्हा परिषद स्तरावर ५०००/- मानधनावर शिक्षक म्हणून काम करण्यास तयार असलेले डिएड तरुण व २०००० रुपये वर सेवानिवृत्त शिक्षक यांना ६ महिनेचे करारपत्र यातून शासनाची शिक्षणाविषयी असलेली भूमिका अनाकलनीय आहे. अनेक सेवानिवृृत शिक्षक विविध कारणांनी ६ महिन्याचे करारपत्र स्वीकारतील पण बेरोजगारी व तरुणांना वैफलयग्रस्त व नैराश्यात नेणाऱ्या शासनास फेरविचार करण्याची गरज आहे. विविध शिक्षक संघटना.आमदार.शिक्षणप्रेमी. समाजसेवी यांनी तात्काळ पावले उचलली नाहीत तर हे असेच तुघलकी निर्णय मोठ्या संख्येने येतील. जिल्हा परिषद नगर पालिका महानगर पालिका शाळातील विदारक चित्र आजही शासनकर्त्यांना दिसत नाही ही खरी खंत आहे. ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला बळकट करण्यासाठी मानसिक प्रगल्भ होण्याची गरज आहे.वरील तुघलकी निर्णय लक्षात घेता कुणालाही गरिबांच्या लेकरांकडे दर्जेदार शिक्षण असावे असे कुणालाच वाटतच नाही का ? शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश वाटप करण्याच्या वलग्ना करनारे अजून पर्यंत शाळांना निधीही देऊ शकले नाहीत पण स्वतःची जबाबदारी नेहमीच पूर्ण करणारे शिक्षक यांनी गणवेश शाळेच्या पहिल्या दिवशी वाटप केले ही अभिमानास्पद बाब आहे
विनोद डहारे
जिल्हा उपाध्यक्ष
शिक्षक भारती संघटना
नागपुर जिल्हा
www.vinoddahare.blogspot.com


No comments:
Post a Comment