Wellcome

हमे आज भी सस्ती चिजो का शौक नही सपने बेचने वालो की खामोशीया भी उनके लफ्जो से ज्यादा महँगी होती है |

Tuesday, March 31, 2020

अन्नाचा मनावर होणारा परिणाम / annacha manavar honara parinam

अन्नाचा आपल्या मनावर काय परिणाम होतो?
यावर आपण एक उदाहरण बघूया 
★"तीन महीन्याचा एक प्रयोग करुन बघा सात्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो कारण जसे अन्न तसे मन होते.सात्विक अन्न हे फक्त शाकाहारी भोजन नाही तर ते ईश्वराच्या स्मरणात बनवलेले भोजन असते.
★जर रागात आपण स्वयंपाक केला असेल तर त्यास सात्विक अन्न म्हणत नाहीत. म्हणून स्वयंपाक  करणाऱ्याने कधीही, रागात, उदास, नाराज होऊन स्वयंपाक करू नये. (अन्न शिजवू नये)
★तसेच कधीही स्वयंपाक करताना आईला, बहिणीला, पत्नीला (जे कोणी स्वयंपाक करत असतील त्यांना) ओरडू, रागवू नये, त्यांच्याशी भांडू नये. कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाक घरात  मध्ये जाऊन स्वयंपाक करताना  त्या पदार्थात त्याच प्रकारची (सर्व रागाची) स्पंदने येतात आणि तेच आपण खाणार असतो. हे लक्षात ठेवण्याची महत्त्व पूर्ण गोष्ट आहे.

भोजन तीन प्रकारचे असते

१) जे आपण  हाॅटेल मध्ये खातो.
२) जे घरात आई, पत्नी बनवते, आणि
३) जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो ते भोजन
असे तिन्ही भोजनात वेगवेगळी स्पंदने असतात.

(१) जे पदार्थ हाॅटलात बनवतात ते विकत घेऊन खावे लागतात , आपण ते नेहमी खाल्ल्यास ती स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाही, त्यामुळे कधी कधी त्या अन्नाने आपणास त्रास ही होतो, ते पदार्थ शिजवण्यात पुरूषाचा हात असतो, त्याचा भाव फक्त आणि फक्त पैसे कमवण्याचा असतो, तोच भाव आपल्यात उतरतो.

(२) घरात आई, पत्नी जे पदार्थ करते ती फार प्रेमाने कआ रीत असते. म्हणून त्या पदार्थात सात्त्विक स्पंदने असतात, ती आपणास समाधानी बनवतात. हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात, त्याच्या मनातील विचार आपणास कधीच सुख देत नाहीत.घरात जर मुलगा जेवत असेल आणि आपल्या आइला म्हणत असेल की मला अजून एक चपाती पाहिजे तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलुन येतो, ती अजून प्रेमाने एक चपाती त्यास वाढेल, ती त्यात प्रेम भरते. पण हेच आपण स्वयंपाकी कडे मागितले तर ती विचार करेल की हा रोज दोन चपाती खातो, आज वेगळी मागतो ती खाण्याचा हिशोब करून चपाती करून देईल पण त्यात प्रेम नसते, असे खाणे अंगी लागत नाही आ मन तृप्त होत नाही 
(३) जो मंदिरात अन्नकोटात म्हणजेच महाप्रसादात खातो ते अन्न भगवंतास परमेश्वराला दाखवलेला प्रसाद असतो ती भावना प्रसादाची असते. ते अन्न ईश्वराला स्मरण करुन शिजवलेले असते म्हणून ते अन्न प्रसाद होते. आपण ही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत असे समजून अन्न बनवावे म्हणजे तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाक घर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करावा म्हणजे रोज प्रसाद भक्षण होईल.
स्वयंपाक करताना अनेक उपाय ही करता येतात, घरात काही त्रास असेल तर त्यावर हा एक उपाय आहे ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा. परमेश्वरास म्हणावे की माझ्या कुटुंबाचे चांगले होऊदे, ते सर्वांशी  सतधर्माने वागु दे त्याच्या मनात शांती निर्माण होऊ दे, हे अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा. हे परमेश्वरा माझ्या पतीला कामाधंद्यात नोकरीत फार टेंशन आहे त्याचा त्रास जाऊ दे व त्यांना सर्व कार्यात यश मिळू दे असे स्वयंपाक करताना म्हणत जा त्यामुळे बराच फरक पडत जातो.कारण जसे अन्न तसे मन होते. अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्कारांचा ही त्यावर नक्की परिणाम होतो (करणाऱ्याच्या मानसिक सात्विक भाव भावनांच्या  संस्कारांचा त्याच्या बनविलेल्या अन्नावर विलक्षण परिणाम होतो.)

No comments: