आजही देशात खूप मोठ्या प्रमाणात शासकीय वाहनांचा दुरुपयोग होताना दिसून येत आहे गरजेच्या वेळी हमखास ही वाहने नादुरुस्त अवस्थेत असल्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात शासकीय वर्ग १ व २ चे अधिकारी यांना शासकीय कामासाठी शासकीय वाहने दिली जातात. पण अनेक अधिकारी त्या वाहनांचा आपल्या खाजगी कामासाठी राजरोसपणे सर्रास वापर करतात त्यामुळे निर्धारित वेळेआधीच त्यांची झीज होते. व ती नादुरुस्त होतात. ऐरवी त्यांच्या दुरुस्तीवर होणारा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. अनेक गंभीर व गरजेच्या परिस्थितीत ही वाहने वापरण्या योग्य राहत नाही. ती फक्त शोभेच्या हत्ती बनून राहतात. खाजगी वापरामुळे पेट्रोल डिझेल चा अत्याधिक वापर व दुरुस्तीचा खर्च तसेच चालकाला होणार मनस्ताप वाचविण्यासाठी शासनाने सर्व शासकीय वाहनांना GPS प्रणाली लावणे आवश्यक आहे. सरकारी वाहनांची अचूक माहिती मिळण्यासाठी व खाजगी कामासाठी होणार गैरवापर यामुळे नक्कीच थांबेल.
No comments:
Post a Comment