Wellcome

हमे आज भी सस्ती चिजो का शौक नही सपने बेचने वालो की खामोशीया भी उनके लफ्जो से ज्यादा महँगी होती है |

Saturday, October 3, 2020

कोरोना महामारी व स्वतःची ओळख

 


मी कोण आहे ? व इतका कशाचा गर्व करतो आहे ? असा प्रश्न स्वताशी केला तेव्हा ते सर्व काही डोळ्यांपुढे आलं जे मी स्वता मागिल काही दिवसांपासून महीन्यांपासून प्रत्यक्षात आपल्या कोविड १९ च्या कर्तव्यात अनुभवले आहे. १) प्रचंड पैसा असूनही केवळ एक  श्वास घेण्यासाठी होणारी धडपड व लांब दूर उभा असलेला त्याचा गोतावळा , त्याची अवस्था पाहून टाहो फोडणारी पत्नी , आई, मुले व पाहता पाहता अंबुलंस मध्ये आक्सिजन लावलेला तो हतबल असलेला मित्रही पाहीला. एकीकडे त्याच्यासाठी व्हेंटीलेटरचा बेड बूक करीत होतो. व चालता बोलता असणारा " तो " अवघ्या १५ मिनिटांत जागेवर कोसळला, धराशाही झाला तो अखेरचाच. मृत्यूनंतर त्याला मृत घोषित करणारे ते वयोवृद्ध रूग्णवाहीकेतील सेवानिवृत्त होऊनही सेवा देणारे डाक्टर व त्यांचे ते दोनच शब्द "माझे उरलेले अनिश्चित आयुष्य फक्त यांच्यासाठीच." कोविड सेंटर मधिल मृत पावलेल्या त्या मनुष्याला मी वाचवू शकले नाही म्हणून अश्रूंचे आक्रंदन करणाऱ्या नव्यानेच सेवेत रूजु झालेल्या डाक्टर व नर्स, व इतर स्टाफ आणी ड्यूटी नसतानाही रात्री अपरात्री येऊन जिवासाठी जिव लावणारे ते रूग्णवाहीकेचे ड्रायव्हर , इतके सर्व पाहून मन एका क्षणासाठी सून्न होते. दोन दोन महीने पगार नाही म्हणून अधिकाऱ्यांना साकडे न घालता निमूटपणे कर्तव्ये बजावणारे , कोविड टेस्टिंग करणारे ते अस्थाई , तुटपूंज्या पगाराचे कर्मचारी बघून मन हेलावते.०२) कोविड केअर सेंटर मधिल लहान लेकराला रात्री अवेळी भूक लागली म्हणून धाब्यावरून स्वताच्या पैशाने पोळ्या, दूध आणून देणारा शिक्षकही अनुभवला.३) कोविड तपासणी शिवाय औषधोपचारा अभावी दवाखान्याच्या पायरीवर जिव सोडणारा गडगंज संपत्तीचा हतबल धनीही याच डोळ्यांनी  पाहीला.४) कोविड प्रमाणपत्रा शिवाय आक्सिजन  मास्क लावणार नाही असा आवाज फोनवर ऐकताच रात्री 12-30 वाजता कार्यालय उघडून प्रमाणपत्र तयार केले व झोपेतून उठवून डाक्टरांना सही करायला लावून त्या रूग्णाला वाचविल्याचा चिरकाल टिकणारा आनंद हृदयात गोळा केला.५) स्वताच्या पाजिटिव असलेल्या आईसाठी, बहीणीसाठी 800 किमी दूरून सदैव धडपडणारा एक हतबल सहकारी मित्रही अनुभवला तसेच स्वताच्या आईची प्रकृती चिंताजनक, भावाचे हार्टचे आपरेशन असून सूटी न घेता प्रशासन व कुटूंब यात मनाची द्विधा करणारा  कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारीही जवळून अनुभवला.६) कूटूंबापासून १५ दिवस दूर राहून अवघ्या काही तासात भेट घेऊन कोविड १९ च्या ड्यूटीवर परत येणारा कर्मचारी मग तो पोलिस असेल किंवा अन्य कुणीही याचा प्रशासनाला काहीही फरक पडत नाही ०७) गरीबीतून शिक्षण घेऊन सरकारी कर्मचारी बननारा एक खेड्यातील  तरूण सांगेल त्या अधिकाऱ्यांचे काम यशस्वीपणे करणारा हरहून्नरी व संपूर्ण आयुष्यात एक निष्ठा जपणारा सुस्वभावी असा आदर्श व्यक्तीमत्व असलेला एक मार्गदर्शकही आयुष्यभर जपला.   प्रत्यक्ष हे सर्व अनुभवल्या नंतर मी गर्व कशाचा करतोय ? या नाशवंत देहाचा की त्या संपत्तीचा जिचा कुणालाच शेवटच्या क्षणी काहीही उपयोग होत नाही मी माझी सेवा , कर्तव्य किती प्रामाणिकपणे करतोय ? त्याची अचूक टक्केवारी मला निघालेलीच नाही. तुकाराम मुंडे, प्रविण दराडे, आशा पठाण अशा अनेक बड्या बेधडक निर्णय घेणाऱ्या  अधिकाऱ्यांच्या सोबत काम केल्यामुळे आता नुसतेच मनाविरूद्ध कागदी घोडे नाचविण्यास मन मानत नाही. आपण कुणाला फसवितोय याचं उत्तर मला तरी अजूनही सापडलेलं नाही. विनोद डहारे भिवापूर 9921033117

No comments: