पैश्याच्या आकर्षणाचा नियम हा मानवी जीवनाचा कल्पतरु आहे आपल्या पुराणांमध्ये कल्पवृक्षाचं वर्णन केलेलं आहे, त्याच्याकडे जे मागितलं ते मिळतं असे सांगितले आहे खरचं अस्तित्वात असतो का असा वर्णन केलेला कल्पवृक्ष ? होय मित्रानो कल्पवृक्ष असतो, प्रत्येकाच्या मनात लपलेला असतो. आपलं सुप्त मन आणि त्यात लपलेली अफाट शक्ती हेच आपल्या प्रत्येकाच्या मनात लपलेले कल्पवृक्ष, सुप्त मनाला कळत नकळत जे मागाल, ते नक्की मिळतंच १०० टक्के मिळतं हे खरे आहे नकळत त्याला जी काही आज्ञा द्याल ती पूर्ण होतेच होते, आणि आयुष्याबद्दल ज्या तक्रारी कराल, त्याही तो प्रत्यक्षात आणतो, पूर्ण करतो. जरा आठवून पहा कळत नकळत अशी वाक्ये तुमच्या बोलण्यात येत असतील माझ्या हातात पैसा टिकत नाही,मला उत्पन्नाचं साधन नाही, जगणं खुप अवघड झालयं, लोकं माझी उधारी वेळेवर देत नाहीत माझ्या डोक्यावर खुप कर्ज झालयं मला रहायला स्वतःचं घर नाही, माझं नशीबचं फुटकं मला जास्त पैसा नको रे बाबा ,माझं आयुष्य बकवास झालयं. मला जगण्यात रस उरला नाही. मरावसं वाटत आहे, मला फस्ट्रेशन आलयं, मी डिप्रेशनमध्ये आहे, मला खूपच स्ट्रेस येतो. वगैरे शब्द जर तुमच्या रोजच्या बोलण्यात असे शब्द येत असतील तर, ती तुमच्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे. तुम्ही तुमच्या सुप्त मनाला नकळत आज्ञा देत आहात, आणि दिलेली आज्ञा प्रत्यक्षात आणणं हे त्याचं काम आहे व तो ते इमाने इतबारे पार पाडतो. ते परिस्थीतीला अजूनच बिकट बनवतं., कारण, ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रीत करता, ती गोष्ट अनेक पटींनी वाढते. असे होते की ज्या गोष्टीची आपल्याला भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणून हजर होते. एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो, पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसें दिवस अधिकाधिक कंगाल होतो आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्याला कसला तरी पैश्यांचा फटका बसतोच बसतो, कष्ट नकोत, कष्ट नकोत, पट्टी घोकणार्याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं, का बरं शहरात वाढलेल्या एखादीला नको असलेलं खेड़ गावच ‘सासर’ म्हणून पदरात पडतं आणि एखादीला मनातून मुलगी नको, मुलगी नको असा सतत धावा करुनही मुलगीच होते का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतायतं तर ह्या सगळ्यांना एकमेव कारण आहे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्हाला माहिती आहे जगातील फक्त पाच टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या पंच्यान्नव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडी निवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं सगळं जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खूप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालून जाईल, तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थिती वास्तव बनून समोर येते. उदा. माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं. माझं वजन वाढतयं, म्हंटलं की वजन अजून वाढतं, माझे केस गळतायत म्हंटलं की अजूनच केस गळतात,माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो,कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजून अडचणी निर्माण होतात, ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, तीच गोष्ट घडते. मग मनात चांगल्याच स्वप्नांची आठवण केली तर आपलं मन अगदी कल्पतरुचचं काम करतो. म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवून देता यायला हवं. ह्या सिद्धांताचा फायदा घेऊन रॉबर्ट शुलर ह्या अमेरीकन फिलोसोफर ने कॅलिफोर्नियात जगातला सर्वांत उत्तुंग आणि सर्वात महागडा पण विलोभनीय असा, अख्ख्या जगाला आशेचा किरण दाखवणारा होप टॉवर नावाचा संपूर्ण काचेचा चर्च बांधला. ह्याचा वापर करुन ‘चिकन सुप फॉर द सोल’ च्या लेखकाने, पूर्वी जेमतेम कमाई असणार्या जॅक कॅनफिल्ड याने, अगदी थोड्या अवधीत अब्जावधी डॉलर कमावले. आज तो जगातला एक श्रीमंत व्यक्ती आहे. मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली आहेत आपल्याही ऋषींनी आणि संतांनी हे रहस्य जाणलं होतं आणि ईश्वर प्राप्तीसाठी त्यांनी या रहस्याचा वापर केला. विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणून तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान हवं असल्यास, रोज सकाळी मस्त तयार होवून आरशा समोर उभे राहून, चेहर्यावर स्मितहास्ये ठेवून, मोठमोठ्याने अशी वाक्ये जोरजोरात म्हणा.
Friday, August 20, 2021
पैश्याच्या आकर्षणाचा नियम / Paishachya akarshanacha niyam
1) मी हवा तेवढा पैसा आकर्षित करु शकतो, मी शक्तीशाली आहे.
2) माझ्यात जग बदलण्याची शक्ती आहे.
3) माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार फक्त मलाच अहे,
4) माझ्या आई-वडीलांना, माझ्या परीवाराला माझ्यावर, गर्व आणि अभिमान वाटेल, असे एक काम मी आज करणार आहे.
5) मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असून, प्रचंड संपत्तीवान आहे.
6) मी एका प्रसन्न व्यक्तीमत्वाचा मालक असून, संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरुन आनंद वाटतो.
खळखळून हसवतो.
7) परिस्थितीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. मी परीस्थितीवर सहज मात करु शकतो.
8) माझ्या जिद्दीला भिऊन संकटे दूर पळुन जातात.
9) मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे, आणि ती जिंकली ही आहे.
10) माझ्या आजुबाजुचे, अवतीभवती वावरणारे, सर्व लोक माझ्यावर खूप प्रेम करतात, आणि मी ही त्यांच्यावर खूप खुप प्रेम करतो.
11) मी आतापर्यत माझी बरीचशी स्वप्ने पूर्ण केली आहेत, आणि माझी उरलेली स्वप्ने लवकरचं पूर्ण होणार
आहेत.
12) मी सतत आनंदी असतो. मला रोज नवनव्या कल्पना सुचतात, आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो.
13) मी निरोगी आहे, मला कुठल्याही रोगाची चाहुल लागलेली नाही
14) आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी प्रत्येकाचा आभारी आहे.
15) मी निसर्गाची एक अद्वितीय कलाकृती आहे.
16) आज मी आनंदात जगायचे ठरवले आहे.
याला पॉझीटीव्ह अफैर्मेशन्स म्हणतात ,सकारात्मक स्वयंसुचना म्हणतात , यामुळे दिवसभर एक आगळी वेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल.तुम्ही हे जर मनापासुन, निश्चय करुन बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मेंदुपर्यंत पोहोचलं, तर तुमच्या नकळत तो तुमच्या सार्या आज्ञा पाळेल आणि खर्या करुन दाखवेल.आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ अट्रॅक्शन” ची दणदणीत सुरुवात असेल जगातील काही श्रीमंत लोकांची उदा पहिली तर आपल्याला असा वाटत आपण असे का होऊ शकत नाही होय आपण ही त्यांच्या सारखे होऊ शकतो अगदी वारेन बफेट, एलन मस्क सारखे . करायची आहे ना सुरुवात ? चला करुया सुरुवात आनंदित जीवनाची आज आत्ता ताबडतोब .
www.vinoddahare.blogspot.com
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment